Ulhasnagar Rain Video: सगळीकडे पाणीच पाणी, उल्हासनगरच्या गल्ल्यांमध्ये भयावह अवस्था, शेवटी एक आजीबाई..

उल्हासनगरमधील जिजामाता कॉलनी परिसरात नाला तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एक आजीबाई त्यांच्या घरात अडकून पडल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ulhasnagar Old Age Woman Viral Video

Ulhasnagar Rain Viral Video : कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर,अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू होता.या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि जनजीवन विस्कळीत झाले. पावसाचे पाणी घरांमध्ये,दुकानांमध्ये तसेच रस्त्यांवर शिरल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.उल्हासनगरमधील जिजामाता कॉलनी परिसरात नाला तुडुंब भरल्याने पावसाचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी एक आजीबाई त्यांच्या घरात अडकून पडल्या होत्या.पण त्यानंतर जे काही घडलं, ते पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

आजीबाईंचा जीव धोक्यात होता,पण घडलं असं..

घरात जवळपास तीन फूट पाणी साचल्याने त्यांना बाहेर पडणे शक्य होत नव्हते.त्यामुळे आजीबाईंचा जीव धोक्यात होता. परंतु, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीनं बचावकार्य सुरू केलं आण त्या आजीबाईंची सुटका केली.अग्निशमन विभागाच्या या धाडसी कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आणि  आजीबाईंनी अग्निशमन दलाचे आभार मानले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक सस्पेंड, पोलिसी खाक्या दाखवताना कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल

कटाई-बदलापूर रस्त्यावरही साचलं होतं पाणी

डोंबिवली पश्चिमेतील साईनगर,कल्याण पूर्वेतील आडवली-ढोकळी,तसेच कल्याण पश्चिमेतील अहिल्याबाई चौक परिसरात सकाळपासून पाणी साचले होते.दुपारपर्यंत कल्याण-शीळ मार्गावरील सोनारपाडा,मंदिर परिसर तसेच कटाई-बदलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांना काही काळ रस्ते बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.पाण्याचा निचरा करण्यासाठी संबंधित ठिकाणी रस्ते तीन ठिकाणी फोडण्यात आल्याची माहितीही आहे. 

नक्की वाचा >> Pune News: पुणे शहरात शाळकरी मुली कशाबशा वाचल्या, अंगावर काटा आणणारा CCTV Video आला समोर