यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune CCTV Footage Viral : पुणे शहरात दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे झाड कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत.अशातच पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकात रस्त्याच्या कडेला असलेले झाड अचानक कोसळले.यावेळी एक तरुणी रस्ता ओलांडत होती. मात्र, काही क्षणांच्या फरकाने ती थोडक्यात बचावली.संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अन् वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या
दरम्यान,मुसळधार पावसामुळे अभिनव चौकातही रस्त्याच्या मधोमध मोठे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.झाड रस्त्यावर आल्यामुळे मध्य पेठांकडे जाणारा बाजीराव रस्ता सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.याचा परिणाम टिळक रस्ता,बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता या प्रमुख मार्गांवरील वाहतुकीवर झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
नक्की वाचा >>Mumbai Rain Video: कल्याण डोंबिवलीसह हा परिसर जलमय, शिळफाटा-मुंब्रा रोड पाण्याखाली, घरांमध्येही शिरलं पाणी
अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभाग आणि उद्यान विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर झाड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. काही वेळातच झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला.
Pune | Tree Collapse | झाड पडतानाचा CCTV, थोडक्यात बचावल्या शाळकरी मुली | NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 1, 2026
पुण्यातून काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावरून शाळकरी मुली जात असतानाच अचानक एक मोठे झाड त्यांच्या अगदी समोर कोसळले. सुदैवाने या मुलींच्या सतर्कतेमुळे आणि देवाच्या कृपेने त्या… pic.twitter.com/EDJNpwNvsH
नक्की वाचा >> Navi Mumbai News: नवी मुंबईच्या 'या' सोसायटीतील सहा मजली इमारतीचा स्लॅब कोसळला, एका कुटुंबासोबत भयंकर घडलं
झाड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि वाहनचालकांनी मोठ्या झाडांच्या परिसरात तसेच जुन्या वृक्षांजवळून जाताना सावधगिरी बाळगावी,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world