ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 3 दिवस पाणीपुरवठा अनियमित होणार

Thane Water Suply News : भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
ठाणे:

मुसळधार पावसाचा फटका ठाणेकरांना बसताना दिसत आहे. भरपावसात मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे. कारण ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस अनियमित पाणी पुरवठा होणार आहे. नदी पात्रातील गाळामुळे पंपिंग स्टेशनवर परिणाम झाला आहे.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे.     

(नक्की वाचा- मुंबईकरांना सल्ला, कोकणात अलर्ट, राज्यभरातील पावसाबाबत मुख्यंत्र्यांकडून महत्त्वाचे अपडेट)

दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात 9. समस्या निर्माण झाली आहे.

त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस म्हणजेत 9, 10 आणि 11 जुलै रोजी अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार आहे.  त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

(नक्की वाचा : मुसळधार पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्री मदतीविना, आमदार ट्रॅकवर; विधानभवन गाठण्यासाठी पावसात पायपीट )

Topics mentioned in this article