जाहिरात

मुसळधार पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्री मदतीविना, आमदार ट्रॅकवर; विधानभवन गाठण्यासाठी पावसात पायपीट

लोकल सेवा सुरळित करण्याच्या प्रयत्नात अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या होत्या तर काही धीम्या गतीने सुरू होत्या. परिणामी अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे.

मुसळधार पावसामुळे मदत पुनर्वसन मंत्री मदतीविना, आमदार ट्रॅकवर; विधानभवन गाठण्यासाठी पावसात पायपीट
मुंबई:

मुंबईतील मुसळधार पावसामुळे पहाटे लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्टेशनवरील ट्रॅकवर पाणी साचल्याने ठाणे ते CSMT लोकल सेवा ठप्प झाली होती. दरम्यान हळूहळू लोकल सेवा पूर्वपदावर येत आहे. परिणामी सकाळी नोकरीसाठी निघालेल्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला. केवळ नोकरदारवर्गालाच नाही तर आमदारांनाही पावसाचा फटका सहन करावा लागत असल्याचं चित्र आहे. 

मुसळधार पाऊसमुळे आमदार महोदयांनाही फटका बसला आहे. आपाआपल्या मतदारसंघातून मुंबईला अधिवेशनाला जाणारे आठ आमदार कुर्लाजवळ पाऊसमुळे अडकून पडले होते. हे सर्वजण हावडा मेलने मुंबईला निघाले होते. बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह विदर्भ आणि मराठवाड्याचे आठ आमदार मुसळधार पावसामुळे एक्स्प्रेसमध्ये अडकून पडले. 

Latest and Breaking News on NDTV

पावसाळ्सात अडीअडचणीत मदत पुनर्वसन खाते मदतीला येतं. पण मुसळधार पावसाचा थेट फटका मदत पुनर्वसन खात्याच्या मंत्र्यांना बसल्याचं दिसत आहे. त्याच खात्याच्या मंत्रीला बसलाय…मंत्री अनिल पाटील यांनाच रेल्वे ट्रॅकवरून चालायची वेळ आली. त्यामुळे सर्वसामान्यांना काय काय सहन करावं लागतं हे आता मंत्रिसाहेबांना कळेल अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोल्हापूरहून निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईतील बदलापूर येथे अडकली होती. या रेल्वेतून मंत्री हसन मुश्रीफ प्रवास करत होते. मात्र तातडीने ओळखीच्या व्यक्तीला बोलावून मुश्रीफ विधान भवनाकडे रवाना झाले.

Latest and Breaking News on NDTV

लोकलसेवा विस्कळीत झाल्याने एक्स्प्रेस गाड्या धीम्या गतीने सुरू होत्या. लोकल सेवा सुरळित करण्याच्या प्रयत्नात अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबवण्यात आल्या होत्या तर काही धीम्या गतीने सुरू होत्या. परिणामी अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती आहे. पावसाचा आमदारांना फटका विदर्भ, अमरावती एक्सप्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकली होती. यामधून आमदार महोदय प्रवास करीत होते. या ट्रेनमधून 10-12 आमदार प्रवास करीत होते. मात्र ट्रेन खोळंबल्याने अमोल मिटकरी, मंत्री अनिल पाटील ट्रेनमध्ये अडकले होते. आमदार सुलभा खोडके, आमदार हरिश पिंपळे देखील रेल्वे धीम्या गतीने असल्याने अडकून पडले. जोगेद्र कवाडे - एकनाथ खडसे यांनादेखील देखील रेल्वे धीम्या गतीने सुरू असल्याचा फटका बसला. शेवटी आमदार महोदय यांनी ट्रॅकवर उतरून चालण्यात सुरूवात केल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे. 

Latest and Breaking News on NDTV

मुंबईतील अतिवृष्टीमुळे विधानसभा कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज सकाळी 11 वाजता विधानसभा कामकाज सुरू होणार आहे. मात्र अतिवृष्टीमुळे आमदार व मंत्री पोहचले नसल्यास कामकाज काही वेळेसाठी स्थगित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतील. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com