जाहिरात

Waves Summit 2025 : वेव्ह्ज हा भारतातील ऑरेंज इकॉनॉमीचा उदय : PM नरेंद्र मोदी

PM Modi in Waves Summit 2025: भविष्यात वेव्ह्ज पुरस्कारदेखील सुरु केले जाणार आहे. आर्ट आणि क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असतील, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

Waves Summit 2025 : वेव्ह्ज हा भारतातील ऑरेंज इकॉनॉमीचा उदय : PM नरेंद्र मोदी
WAVES 2025

WAVES 2025 : वर्ल्ड ऑडिओ व्हिडिओ एंटरटेंमेंट समिट 2025 ला (WAVES 2025) आज मुंबईत सुरू झाली आहे. चार दिवसांच्या वेव्ह्ज समिटमध्ये सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी भाग घेतला. वेव्ह्जच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना लोकांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात ऑरेंज इकोनॉमीचाही उल्लेख केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, वेव्ह्ज हा भारतातील ऑरेंज इकॉनॉमीचा उदय आहे. कंटेन्ट, क्रिएटीव्हिटी आणि कल्चर हे ऑरेंज इकॉनॉमीचे तीन आधारस्तंभ आहेत. भारतीय चित्रपटांची पोहोच आता जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. आज भारतीय चित्रपट 100 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होतात. परदेशातील लोक भारतीय सिनेमा पाहतच नाहीत, तर समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आज मोठ्या संख्येने परदेशी प्रेक्षक सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहत आहेत. ओटीटी उद्योग 10 पटीने वाढला आहे. स्क्रीनचा आकार कदाचित लहान होत चालला असेल, पण त्याची व्याप्ती अनंत आहे. स्क्रीन मायक्रो  होत चालली आहे, पण मेसेज मेगा होत चालला आहे.  

(नक्की वाचा- WAVES 2025 : 'वेव्ह्ज' हा केवळ शब्द नाही तर ही एक लाट आहे : PM नरेंद्र मोदी)

(WAVES समिट में फिल्मस्टार अनिल कपूर)

येणाऱ्या काळात  भारतीतील क्रिएटीव्हिटी क्षेत्रातील इकोनॉमी भारतातील अर्थसंकल्पात मोठं योगदान देईल. आज भारत फिल्म प्रोडक्शन, डिजिटल कटेन्ट, गेमिंग, फॅशन, म्युझिकचं ग्लोबल हब बनत आहे. ऑरेन्ज इकोनॉमीच्या या वाढीत वेव्ह्जच्या मंचावरून देशातील युवा क्रिएटर्सना सांगेल की, तुम्ही सगळे भारतातील इकोनॉमीत एक लाट आणत आहात. क्रिएटीव्हिटीची ही लाट तुमची मेहनत, तुमची आवड चालवत आहे. आमचं सरकार तुमच्या प्रयत्नांमध्ये सोबत आहे, असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलं.  

भविष्यात वेव्ह्ज पुरस्कारदेखील सुरु करणार

माझा विश्वास पक्का झाला आहे की तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे येणाऱ्या काळात वेव्ह्जला नवी उंची मिळेल. इंडस्ट्रीतील माझ्या सहकाऱ्यांना माझं आवाहन असेल, पहिल्या समिटमध्ये तुम्ही जे केलंय ते पुढेही सुरु ठेवा. वेव्ह्जमध्ये अनेक सुंदर लाटा येणे अजून बाकी आहे. भविष्यात वेव्ह्ज पुरस्कारदेखील सुरु केले जाणार आहे. आर्ट आणि क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार असतील, अशी माहिती देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.

(नक्की वाचा-  Pune News: महाराष्ट्र दिनी पुणेकरांना मोठी भेट, वाहतुकीच्या कटकटीतून होणार सुटका)

(मुंबई में WAVES समिट का आयोजन)

क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड'

आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. भारत ग्लोबल फिनटेक अॅडॉप्शन रेटमध्ये नंबर वन आहे. जगातील दुसरा मोठा मोबाईल मॅन्युफॅक्चरल देश आहे.  जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम भारतात आहे. विकसित भारताचा आपला प्रवास आता सुरु झाला आहे. याहून अधिक काही करणे बाकी आहे. 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड'ची ही योग्य वेळ आहे. वेव्ह्ज क्रिएटिव्ह जगातील म्युझिक, फिल्म, अॅनिमेशन, गेमिंग क्षेत्रातलं भारतातील कानाकोपऱ्यात जे टॅलेन्ट आहे, त्यांना व्यासपीठ प्रदान करेल, ज्यांचं जग देखील त्यांचं कौतुक करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: