Weather Update : मुंबईचा पारा घसरला, शहरात 16 अंश किमान तापमानाची नोंद

गेल्या दहा वर्षातील मुंबईतील नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापमान...

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ऑक्टोबर हिटपासून त्रस्त झालेल्या मुंबईकरांचा यंदा चांगलाच दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबर महिन्यात कधी नव्हे ते मुंबईकर शाल, जॅकेट घालून घराबाहेर पडताना दिसत आहे. मुंबईचा पारा घसरला असून नोव्हेंबर महिन्यात दहा वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

नक्की वाचा - BMC Job : मुंबई महापालिकेत मेगा भरती, परीक्षेची तारीखही झाली जाहीर

मुंबईत सर्वात कमी 16. 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत गुलाबी थंडी कायम राहणार आहे. उत्तर पश्चिमेकडून वाहणारे थंड वारे राज्यासह मुंबईकडे वाहत आहेत. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे.पुढील दोन ते तीन दिवस किमान तापमान  16-17 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. 

नक्की वाचा - मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार! लवकरच सर्व लोकल होणार AC

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 डिसेंबरपर्यंत हवेत थंडावा राहण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई, कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचं कमाल तापमान 28 तर पहाटेचे किमान तापमान 12 दरम्यान आहे. ही दोन्ही तापमानात सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी घट झाली आहे. 

सातारा जिल्ह्यात पुन्हा तापमानाचा पारा घसरला आहे. महाबळेश्वरमध्ये 15 तर साताऱ्यात 16 अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आले आहे. त्यामुळे महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची मजा घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. 

Advertisement

दोन दिवसांपासून हवेत गारठा वाढला आहे. साताऱ्याचा पारा 16.1 अंशापर्यंत तर महाबळेश्वरचा पारा 15.4 अंशाखाली आल्याने हुडहुडी वाढली आहे. यंदा थंडीची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी दसऱ्यानंतर थंडी पडू लागते आणि दिवाळीत थंडीचा कडाका जाणवतो. मात्र यावर्षी वातावरणातील बदल, लांबलेला परतीचा पाऊस यामुळे अभ्यंगस्नानाला थंडीची तीव्रता कमीच होती. दिवाळीच्या तोंडावर दोन दिवस हवेत गारठा जाणवला. मात्र पुन्हा तापमानात वाढ झाली. सध्या पहाटेच्यावेळी थंडीने हुडहुडी भरत आहे.


कुठे किती तापमान?

मुंबई - 16.8
ठाणे - 22.2
नाशिक - 10.8
पालघर - 19
अलिबाग - 16.6
अहिल्यानगर - 9.7
छ. संभाजीनगर - 12.1
जळगाव - 11
कोल्हापूर - 15.7
महाबळेश्वर - 12.6
मालेगाव - 13
नांदेड - 11.8
नंदुरबार - 13.2
धाराशिव - 16
परभणी - 12
सांगली - 15.3
सातारा - 12.9
सोलापूर - 15.5

Advertisement