मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकलचा प्रवास आता गारेगार होण्याची शक्यता आहे. कारण लोकल गाड्यांचे पूर्णपणे एसी लोकलमध्ये रूपांतर करण्याची योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महायुतीचं स्थिर सरकार राज्यात आल्याने ऑगस्ट 2022 पासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळू शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईकरांना सोईसुविधा प्रदान करणे आणि शहरातील वाढत्या उष्णतेचा आणि गर्दीच्या परिस्थितीतून नागरिकांची काहीअंशी सुटका करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. एसी लोकलमुळे रेल्वे नेटवर्कचे आधुनिकीकरण होईल, प्रवाशांचा अनुभव सुधारेल.
(नक्की वाचा - गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, कशेडी बोगदा 15 दिवसांसाठी बंद)
प्रवासही होईल सुरक्षित
एसी लोकलमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील सोडवला जाऊ शकतो. एसी लोकलमध्ये केवळ नागरिकांचा प्रवासाचा अनुभव सुधारेल असं नाही, तर धावत्या रेल्वेतून पडून प्रवाशांचे होणारे मृत्यू देखील रोखले जातील. बंद दरवाजांमुळे सर्व प्रवास रेल्वेच्या आत सुरक्षित राहतील.
(नक्की वाचा- एक व्हॉट्सॲप कॉल अन् कोट्यवधी रुपये गायब, मुंबईत 'डिजिटल अरेस्ट'चा धक्कादायक प्रकार)
मुंबई लोकसची वैशिष्ट्ये
मुंबई लोकल दररोज 75 लाख प्रवाशांची वाहतूक करतात. ज्यामुळे ते जगातील सर्वात व्यस्त उपनगरीय रेल्वे नेटवर्कपैकी एक बनले आहे.
शहराच्या कानाकोपऱ्यांना जोडणारी पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईन 390 किलोमीटर पसरलेली आहे.
महिला प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी मुंबईने 1992 मध्ये केवळ महिला लोकल ट्रेन सुरू केल्या.
मुंबई लोकल त्यांच्या वक्तशीरपणासाठी प्रख्यात आहेत. ज्याची फ्रिक्वेन्सी गर्दीच्या वेळी फक्त 3-4 मिनिटांची असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world