जाहिरात

Ambarnath News : पावसात लघुशंका करताना विजेचा झटका, अल्पवयीन मुलाचा मृत्यू

अंबरनाथ पश्चिमेच्या नवीन भेंडीपाडा परिसरात पाऊस सुरू असताना लघवी करायला गेलेल्या तरूणाला नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाला.

Ambarnath News : पावसात लघुशंका करताना विजेचा झटका, अल्पवयीन मुलाचा मृत्यू

निनाद करमरकर, अंबरनाथ

Ambarnath News : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसराला मंगळवारी संध्याकाळनंतर मुसळधार पावसाने झोडपलं. अंबरनाथ, बदलापुरातही पावसाचा जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अंबरनाथ पश्चिम येथे पावसात लघवी करताना एकाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथ पश्चिमेच्या नवीन भेंडीपाडा परिसरात पाऊस सुरू असताना लघवी करायला गेलेल्या तरूणाला नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. विघ्नेश कचरे असं 16  वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. 

(नक्की वाचा-  Rain Forecast: मुंबई, पुण्यात आजही धो-धो; 9 जिल्ह्यांना मुळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट')

याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. मात्र अवकाळी पावसामुळे अंबरनाथमध्ये तरुणाचा नाहक बळी गेला असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

(नक्की वाचा - Kalyan Building Collapse : कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू)

विजेचा धक्का बसून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू

पुण्यातील वारजे येथील रामनगर परिसरात विजेचा धक्का बसून 10 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. मयंक उर्फ दादू प्रदीप अडागळे असं मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयंक घरासमोर खेळत असताना तेथील लोखंडी विजेच्या खांबाला चुकून स्पर्श झाला. त्याच क्षणी त्याला जोरदार विजेचा शॉक बसला. आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत, त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com