Malhar Certificate : मांस विक्रेत्यांसाठीचं 'मल्हार प्रमाणपत्र' काय आहे? याच दुकानांतून मटण खरेदीचं आवाहन राणेंनी का केलं?

What is Malhar Certificate : हिंदू आणि शीखांसाठी हलाल नसलेले मांस उपलब्ध करून देणे. तसेच हिंदू धार्मिक परंपरेनुसार बकरी आणि मेंढीचे ताजे, स्वच्छ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नसावे याची खात्री करणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Malhar Certificate : महाराष्ट्रातील चिकन, मटण दुकानांबाबत एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास  मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी राज्यातील सर्व झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली आहे. या सर्व नोंदणीकृती मांस विक्रेत्यांना 'मल्हार प्रमाणपत्र' दिलं जाणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यानुसार, महाराष्ट्रात मटण विकणारी दुकाने नोंदणीकृत असतील. या दुकानांचे प्रमाणपत्र फक्त हिंदूंनाच दिले जाईल. नितेश राणे यांनी लोकांना आवाहन केले की ज्या दुकानांमध्ये मल्हार प्रमाणपत्र उपलब्ध असेल त्या नोंदणीकृत दुकानातूनच मांस विकत घ्या. या मटण दुकानांमध्ये कोणतीही भेसळ होणार नाही आणि ती हिंदूंकडून चालवली जातील. सरकारच्या या मोहिमेद्वारे हिंदू तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, असंही नितेश राणे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा-  Opposition Leader : अजय चौधरी विरोधी पक्षनेते? विधानसभेत नेमकं काय घडलं?)

Nitesh Rane Tweet

काय आहे मल्हार प्रमाणपत्र?

हिंदू आणि शीखांसाठी हलाल नसलेले मांस उपलब्ध करून देणे. तसेच हिंदू धार्मिक परंपरेनुसार बकरी आणि मेंढीचे ताजे, स्वच्छ आणि इतर कोणत्याही प्राण्यांच्या मांसात मिसळलेले नसावे याची खात्री करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. या अंतर्गत विकले जाणारे हे मांस केवळ हिंदू खाटीक समुदायाच्या विक्रेत्यांकडून उपलब्ध केलेले असेल.

मल्हार वेबसाइटनुसार, मांस तयार करताना काटेकोर हिंदू धार्मिक पद्धतींचे पालन करणाऱ्या विक्रेत्यांना प्रोत्साहन देते. जेणेकरून ते हिंदू खाटीक समुदायाच्या परंपरांचे पालन करेल याची खात्री केली होते.

Advertisement

(नक्की वाचा - Vidhan Sabha : धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश; पोलिसांवर मोठी जबाबदारी)

झटका मटनाला प्राधान्य का?

बहुतेक हिंदू असे मानतात की मांस सेवनाची झटका पद्धत ही एक नैतिक पद्धत आहे. कारण प्राण्याला दीर्घकाळ त्रास न घेता त्वरित मारला जातो. गेल्या काही दिवसात हलाल नसलेल्या उत्पादनांची मागणी देखील वाढत आहे. 

Topics mentioned in this article