
Budget Session 2025 : विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाने भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना याबाबतचं पत्र देखील देण्यात आलं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांची विरोधी पक्षनेते निवड झाली का? अशी चर्चा विधानसभेत रंगली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झालं असं की, विधानसभेचे कामकाज आज सुरु झाल्यानतंर आमदार अजय चौधरी हे विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर जाऊन बसले. ही गोष्ट निदर्शनास येताच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभा अध्यक्षांना "आपण विधानसभा विरोध पक्षनेत्याची निवड केलेली आहे का?"असा प्रश्न विचारला.
(नक्की वाचा- बीडमध्ये 'टीम DM' अॅक्टिव्ह? सुरेश धस, संदीप क्षीरसागरांनंतर प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीच्या VIDEO Viral)
"विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या आसानावर सन्माननीय सदस्य अजय चौधरी साहेब बसले आहेत. त्यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली असेल तर आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल", असंही शंभुराज देसाई यांनी म्हटलं.
नाना पटोले यांनी याबाबत म्हटलं की, "विरोधी पक्षनेत्यांच्या खर्चीवर जसे अजय चौधरी बसले आहेत, तसंच अजित पवार देखील एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसले आहेत." त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटकन म्हटलं की,"कालच शिंदे साहेबांनी सांगितंल की आम्ही अदला बदली करत असतो." अशा पद्धतीने विरोधी पक्षनेतेपदावरुन झालेल्या गमतीशीर संभाषणामुळे सभागृहात हास्याची कारंजी फुटली.
(नक्की वाचा- लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरा-नवरीसोबत भयंकर घडलं; सकाळी बेडरुममधील दृश्य पाहून सगळेच हादरले)
विरोधकांकडे संख्याबळ नाही
महाविकास आघाडीच्या एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नाही. तरीदेखील ठाकरे गटाच्या वतीने विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. यावर अध्यक्ष अंतिम निर्णय घेणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world