'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचा पहिला हफ्ता कधी येणार? तारीख आली समोर

पुण्यात प्राथमिक स्वरूपात 15 हजाराहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. पुण्यात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

Advertisement
Read Time: 1 min

रेवती हिंगवे, पुणे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील हजारो महिलांन आपले अर्ज दाखल केले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 तारखेला मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ 17 ऑगस्टला पुण्यातून होणार आहे. 

पुण्यात प्राथमिक स्वरूपात 15 हजाराहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. पुण्यात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्यभरातून एक कोटी 42 लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे. राज्यातून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली आहे. 

काय आहे लाडकी बहीण योजना?

राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी राज्य सरकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे. 

महिलांना दरमाह 1500 रुपये मिळणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. 

Advertisement