- दिल्ली क्राईम सिझन तीन ही वेब सिरीज मानवी तस्करी विषयावर आधारित असून आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार विजेती आहे
- सिरीजमधील बडी दीदी ही मानवी तस्करी करणाऱ्या टोळीची प्रमुख असून तिच्या भूमिकेत हुमा कुरेशी दिसते
- बडी दीदीचे खरे नाव मीना असून ती समाजसेवेच्या नावाखाली गरीब मुलींचे अपहरण करून त्यांची तस्करी करते
देशभरात अनेक महिला या अचानक गायब होतात. पण त्यांचा काही एक पत्ता लागत नाही. यामागे एक मोठी गँग कार्यरत असते. त्यांचे इंटरनॅश्नल कनेक्शनही असतात. त्यातून त्यांचे भयंकर रॅकेट चालते. यातूनच एक पात्र समोर आले ते म्हणजे बडी दीदी. या बडी दीदीच्या माध्यमातूनच हे रॅकट चालते. त्यामुळे ही बडी दीदी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. गुगलवर अनेक लोक ही बडी दीदी कोण हे सर्च करत आहेत. ते सर्च केल्यानंतर त्यांना उत्तरही मिळत आहे. ही बडी दीदी दुसरी तिसरी कोणी नसून दिल्ली क्राईम 3 या वेब सिरीज मधील खलनाईका बडी दीदी आहे.
दिल्ली क्राईम' ही आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार विजेती वेब सीरिज आहे. ती दिल्ली पोलिसांच्या गुन्हेगारी तपास कामावर आधारित आहे. या सीरिजचा तिसरा सिझन नोव्हेंबर 2025 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या सिझन 3 चे कथानक मानवी तस्करी (Human Trafficking) या गंभीर आणि संवेदनशील विषयावर आधारित आहे. एका जखमी आणि बेवारस बाळाच्या आईचा शोध घेताना डीआयजी वर्तिका चतुर्वेदी (DCP Vartika Chaturvedi) आणि त्यांच्या टीमला एका मोठ्या आणि आंतरराज्यीय मानवी तस्करी टोळीचा पर्दाफाश करावा लागतो. त्या टोळीची प्रमुख ही बडी दीदी असते. या बडी दीदीचे काम प्रेक्षकांच्या खास पसंतीला उतरले आहे.
या सिझनची कथा 2012 मधील 'बेबी फलक केस' (Baby Falak case) या दिल्लीला हादरवून सोडणाऱ्या सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते. या सिरीजमध्ये शेफाली शाह (Shefali Shah) यांनी डीआयजी वर्तिका चतुर्वेदी ('मॅडम सर') ची भूमिका केली आहे. तर राजेश तैलंग (Rajesh Tailang) यांनी भूमेंद्र सिंग (Bhupender Singh) यांच्या भूमिकेत आहेत. रसिका दुगल (Rasika Dugal)यांनी आयपीएस नीती सिंग यांती भूमीका साकरली आहे. तर बहुचर्चीत बडी दीदीच्या भूमीकेत हुमा कुरेशी (Huma Qureshi) दिसत आहे. हुमा कुरेशीने आपल्या दमदार भूमीकेमुळे सर्वांचीच मनं जिंकली आहेत.
'बडी दीदी' हे पात्र 'दिल्ली क्राईम सिझन 3' चे सर्वात महत्त्वाचे आणि मुख्य खलनायक आहे. 'बडी दीदी' चे खरे नाव या वेब सिरीजमध्ये मीना असे आहे. हे पात्र हुमा कुरेशी यांनी साकारले आहे. ही बडी दीदी ही एक अत्यंत क्रूर आणि धूर्त गुन्हेगार आहे. ती समाजसेवेच्या नावाखाली, देशातील गरीब आणि असुरक्षित कुटुंबातील अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांची तस्करी (Human Trafficking) करते. त्यांना सर्वाधिक पैसे देणाऱ्यांना विकते. या सिझनमध्ये डीआयजी वर्तिका चतुर्वेदी (Madam Sir) आणि बडी दीदी यांच्यातील तत्त्वे, शक्ती आणि बुद्धीचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. बडी दीदीचे हे निर्दयी आणि 'नैतिकतेचा शून्य मापदंड' असलेले पात्र सीरिजला एक वेगळी धार देते.
देशात गेल्या काही दिवसात महिलांच्या तस्करीच्या बातम्या समोर आल्या. त्यात काही महिला या प्रमुख सुत्रधार असल्याचं ही समोर आलं. ज्या महिला याच्या प्रमुख सुत्रधार होत्या त्यांना बडी दीदी संबोधलं जावू लागलं. त्यामुळे हे नाव सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. लोक बडी दीदी म्हणजे नक्की काय हे सर्च करताना दिसत आहे. त्याच उत्तर त्यांना दिल्ली क्राईम 3 या वेबसिरीज मधून मिळत आहे. त्यामागची कथाही त्यामुळे त्यांना आकर्षित करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world