जाहिरात

Bhagyashree Navtakke : कोण आहेत पुण्यातील IPS भाग्यश्री नवटक्के? ज्यांचा 1200 कोटी कथित घोटाळ्याशी आहे संबंध..

यापूर्वीही एका व्हिडिओ प्रकरणात त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

Bhagyashree Navtakke : कोण आहेत पुण्यातील IPS भाग्यश्री नवटक्के? ज्यांचा 1200 कोटी कथित घोटाळ्याशी आहे संबंध..
पुणे:

आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटक्के (IPS Bhagyashree Navtakke) यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक आणि गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणात खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप नवटक्के यांच्याविरोधात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील डेक्कन पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर व पिंपरी-चिंचवडमधील आळंदी पोलीस ठाण्यात नोव्हेंबर 2020 मध्ये तीन गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यावेळी पुण्यातील तपास आर्थिक गु्न्हे शाखेकडून सुरू होता. तत्कालिन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटक्के (Who is IPS Bhagyashree Navtakke) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पतसंस्थेने स्वस्तात मालमत्ता विकत घेणे, तसेच कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी जळगावमधून सुनील झंवरला अटक केली होती. तसेच, जळगावमधील मालमत्तेवर छापा टाकला होता.  पोलिसांच्या पथकाने जळगावत 10 ठिकाणी छापे टाकले होते.

त्यानंतर पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणातील संशयित सुनील झंवर याने गृहविभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यावरुन चौकशी सुरू होती. या अर्जानुसार, एकाचवेळी तीन गुन्हे, तसेच दोन ठिकाणी तक्रारदार उपस्थित नसतानाही घाईत आणि कोणतातरी हेतू ठेवून गुन्हे नोंदवले असे नवटक्के यांच्यावर दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

जातीय तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी बदली...
2019 मध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ नवटक्के यांचा असल्याचं म्हटलं जात होतं.  एका सभागृहात खुर्चीवर बसून भाग्यश्री नवटक्के चर्चा करीत होत्या. 

नक्की वाचा - IPS Bhagyashree Navtake पुणे पोलिसांमध्ये खळबळ! आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मागील एका प्रकरणात अॅट्रोसिटीनुसार गुन्हा दाखल होता. आरोपी सवर्ण होता. त्याला अटक करण्याऐवजी मदत कशी केली आणि दलितांना धडा कसा शिकवला हे सांगताना त्यांचं मोबाईलमध्ये चित्रीकरण होत होतं. त्या म्हणाल्या होत्या की, मी गेल्या 6 महिन्यात 21 दलितांना फोडले आहे, मुस्लिमांना फोडले आहे. माझ्या या कारवाईमुळे सगळ्यांना कडक मेसेज मिळाला आहे, की मॅडम कुणालाच सोडत नाही.
महत्त्वाची सामाजिक जबाबदारी असलेल्या या आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या या वक्तव्याचे दलित समाजाकडून निषेध करण्यात आला होता. त्यानंतर भाग्यश्री नवटक्के यांची औरंगाबादला बदली करण्यात आली होती. 

भ्रष्टाचार बाहेर काढला...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात भ्रष्टाचार झाला होता. भरतीवेळी हा घोटाळा झाला होता. नवटक्के यांनी या प्रकरणात मुळापर्यंत जाऊन विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चांगलं काम केलं होतं. त्यामुळे डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. त्यावेळी त्या पुणे विभागाच्या पोलीस आयुक्त होत्या. नवटक्के यांची आरोग्य भरती घोटाळा, म्हाडा भरती पेपरफुटी, टीईटी घोटाळा प्रकरणात चांगलं काम केलं होतं. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
नागपुरात भाजपच्या 'गुप्त बैठका', बैठकीसाठी बड्या नेत्याचा 2 दिवस मुक्काम
Bhagyashree Navtakke : कोण आहेत पुण्यातील IPS भाग्यश्री नवटक्के? ज्यांचा 1200 कोटी कथित घोटाळ्याशी आहे संबंध..
shivaji statue collapse  Maratha community announces reward for Jaideep Apte arrest
Next Article
"जयदीप आपटेची बोटं छाटून आणा, तसे करणाऱ्याला...' थेट बक्षिस जाहीर केलं