- सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळेच्या लग्नात दिग्गजांनी उपस्थिती लावली होती
- कायनात धार ही मूळची काश्मिरी असून दिल्लीमध्ये करिअर केलं असून पवार कुटुंबाच्या जवळची आहे
- कायनात पार्थ पवार यांची मैत्रिण असून अनेक कार्यक्रमांमध्ये ती त्यांच्या सोबत दिसली आहे
सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा ग्रँड विवाह सोहळा नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्यात दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. या दिग्गजांची जशी चर्चा या लग्नात होती तशीच चर्चा एका खास व्यक्तीची ही होती. ही खास व्यक्ती पवार कुटुंबात उठून दिसत होती. तिची उपस्थिती ही प्रखर्षाने जाणवत होती. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून कायनात धार ही आहे. कायनातने पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांसह या लग्नात ग्रँड एन्ट्री घेतली. त्याच वेळी सर्वांच्या नजरा कायनातवर खिळल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने चर्चा सुरू झाली ती ही कायनात कोण याची.
कायनात धार ही मूळची काश्मीरची रहिवाशी आहे. पण तिने आपलं करिअर दिल्लीत केलं आहे. विशेष म्हणजे ती पवार कुटुंबाच्या जवळची समजली जाते. शिवाय ती पार्थ पवार यांची मैत्रिण असल्याचं ही बोललं जातं.एकदा नाही तर अनेक वेळा ती पार्थ पवार यांच्या सोबत दिसली आहे. तेव्हापासूनच उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. काही महिन्यापूर्वीच पार्थ आणि कायनात यांना मध्य प्रदेशात पाहीलं गेलं होतं. ते महाकाल मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यांचे त्यावेळीच दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर पाहीले गेले होते. त्याच बरोबर ते व्हायरल ही झाले होते. रेवतीच्या लग्नातही ती दिसली आणि तिने सर्वांची मनं जिंकली.
कायनात आणि पार्थ यांचे रिलेशन काय याचे मात्र कोणी ही ठोस उत्तर दिलेले नाही. पवार कुटुंबाकडून ही त्याबाबत काही ही भाष्य केलेलं नाही. मात्र कायनात ही पवार कुटुंबाच्या प्रत्येक कार्यक्रमात दिसली आहे. मग ते सुखाचं कार्य असो की दुख:चं. तिची उपस्थितीत सर्वांच्याच नजरेत आली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर ही याच कायनातला बारामतीत पाहिलं गेलं होतं. त्यावेळी ही ती पार्थ यांचं सांत्वन करताना दिसली. त्याच बरोबर मुंबईत अजित पवारांची शोक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेत ही तिने हजेरी लावली होती.
कायनातच्या या उपस्थितीमुळे तिचे आणि पवार कुटुंबाचे संबंध काय याची चर्चा रंगली आहे. कायनातची जशी या लग्नात चर्चा झाली तशीच चर्चा आणखी एका व्यक्तीची झाली. ती म्हणजे माजी गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे यांची कन्या आणि खासदार प्रणिती शिंदे यांची. नेहमीच साध्या राहणाऱ्या प्रणिती या लग्नात मात्र खास वेशभूषेत दिसल्या. त्यांनी मोरपिशी रंगाची काठपदराची साडी नेसली होती. हलका मेकअप केल्याचे व्हिडीओत ही दिसत आहे. त्या वडील सुशिल कुमार शिंदे यांच्यासोबत या लग्न सोहळ्यात दिसल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world