जाहिरात

Revathi Sule Marriage: सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानी कोण आहेत? वडीलांचे 'भाजप'सोबत आहे खास नातं

रेवती सुळे या देखील 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'च्या माजी विद्यार्थिनी आहेत. आता हे दोघे ही लग्न बंधनात अडकले आहेत.

Revathi Sule Marriage: सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानी कोण आहेत? वडीलांचे 'भाजप'सोबत आहे खास नातं
  • सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांचा मुंबईत सारंग लखानी यांच्यासोबत विवाह पार पडला
  • सारंग लखानी यांनी नागपूर विद्यापीठातून बीकॉम पदवी, आयआयएम बेंगलोरमधून व्यवस्थापन शिक्षण पूर्ण केले आहे
  • त्यांनी मे २०२३ मध्ये अमेरिकेतील कोलंबिया बिझनेस स्कूलमधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे याचा विवाह नुकताच पार पडला. प्रसिद्ध व्यावसायिक अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी यांच्या बरोबर हा विवाह झाल. रविवारी मुंबईत हा हाय प्रोफाईल विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला. या लग्नाला राजकीय, व्यावसायिक आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यापासून ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावली. मात्र रेवती यांचे पती सारगं लखानी काय करतात? त्याचं लग्न कसं जुळलं याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.  

रेवती सुळे या परिचित चेहरा आहे. मात्र त्यांचे पती सारंग लखानी यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता आहे. ​सारंग लखानी हे केवळ एका मोठ्या व्यावसायिक घराण्याचे वारसदार नाहीत. तर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी 2014 मध्ये नागपूर विद्यापीठातून बीकॉमची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी आयआयएम बेंगलोरमधून (IIM Bangalore) व्यवस्थापनाचे शिक्षण पूर्ण केले आहे. मे 2023 मध्ये त्यांनी अमेरिकेतील नामांकित 'कोलंबिया बिझनेस स्कूल'मधून एमबीए (MBA) ची पदवी ही संपादन केली आहे.

नक्की वाचा - Viral Video: दुबईत फुटपाथवरून चालणाऱ्यांना काय वागणूक मिळते? दुबईतून आलेल्या तरुणीचा Video सर्व काही सांगतोय

​रेवती यांचे पती सारंग लखानी हे गेल्या 8 वर्षांपासून 'विश्वराज ग्रुप'मध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळतात. यापूर्वी त्यांनी 'मॉडर्न हायड्रोजन' कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट कन्सल्टंट म्हणूनही काम केले आहे. विशेष म्हणजे, सारंग हे एक उत्तम बॅडमिंटनपटू आहेत. हे फार थोड्या लोकांना माहित आहे. त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग ही नोंदवला आहे. रेवती सुळे या देखील 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'च्या माजी विद्यार्थिनी आहेत. आता हे दोघे ही लग्न बंधनात अडकले आहेत. 

नक्की वाचा - Weight Loss: भन्नाट देसी डाएट! एका झटक्यात तरुणीने घटवले 26 किलो वजन, वाचा तिचा 'देसी' डाएट प्लॅन

​मुंबईत पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि प्रीती अदानी, तसेच अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, जॅकी श्रॉफ यांसारखे कलाकार उपस्थित होते. राजकीय वर्तुळातून राहुल गांधी, अखिलेश यादव, मल्लिकार्जुन खर्गे, पीयूष गोयल, भगवंत मान, असदुद्दीन ओवैसी आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी नवविवाहित दांपत्याला शुभेच्छा दिल्या. संगीत सोहळ्यात शाहरुख खानने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com