जाहिरात

Viral Video: दुबईत फुटपाथवरून चालणाऱ्यांना काय वागणूक मिळते? दुबईतून आलेल्या तरुणीचा Video सर्व काही सांगतोय

दुबई आणि भारताची लोकसंख्या आणि परिस्थिती वेगळी असल्याने अशी थेट तुलना करणे योग्य नसल्याचेही म्हटले आहे.

Viral Video: दुबईत फुटपाथवरून चालणाऱ्यांना काय वागणूक मिळते? दुबईतून आलेल्या तरुणीचा Video सर्व काही सांगतोय
  • दुबईतील शिस्त आणि स्वच्छता या गोष्टी पर्यटकांना अत्यंत कौतुकास्पद वाटतात आणि त्यांचा अनुभव सकारात्मक असतो
  • दुबईमध्ये वाहतूक नियमांचे कडक पालन होते आणि पादचाऱ्यांना झेब्रा क्रॉसिंगवर पूर्ण सन्मान दिला जातो
  • तिथली स्वच्छता अत्यंत प्रभावी असून धूळ आणि प्रदूषणाची समस्या जवळजवळ नाही असं स्थानिक पर्यटकांनी नमूद केलं आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दुबईत फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जगभरातले पर्यटक इथं येत असतात. दुबईची शिस्त, तिथली स्वच्छता आणि वाहतूक नियमांचे होणारे कडक पालन हे सर्वांसाठीच कौतूकाचे आहे. तिथे जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला या गोष्टी भावतात. भारतातून ही अनेक पर्यटक दुबईत जातात. नुकतीच एक तरूणी दुबईत फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला तिथे आलेल्या अनुभवाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. शिवाय सोशल मीडियावर यातून एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. निकिता लखवानी (nikkiyapped) नावाच्या इन्स्टाग्राम युझरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटिझन्समध्ये एकच चर्चा रंगली आहे. काही युझर्सनी तिने  व्यक्त केलेल्या मताशी सहमती दर्शवली आहे, तर काहींनी भारत आणि दुबईची तुलना करण्यावरून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. ​निकिताने व्हिडिओमध्ये काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. दुबईहून भारतात परतल्यानंतरही तिच्या मनातून दुबई काही जात नाही. ती म्हणते तिथले रस्ते आणि तिथली शिस्त जबरदस्त आहे. दुबईमध्ये आलिशान गाड्या अत्यंत शिस्तीने आणि नियमाच्या चौकटीत चालवल्या जातात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर एखादा पादचारी झेब्रा क्रॉसिंगवर रस्ता ओलांडण्यासाठी उभा राहिला, तर सर्व गाड्या तिथेच थांबतात. यामुळे पादचाऱ्यांना सन्मान दिला जातो. शिवाय त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते. हे मनाला भावलं असं ही ती म्हणते.  

नक्की वाचा - Weight Loss: भन्नाट देसी डाएट! एका झटक्यात तरुणीने घटवले 26 किलो वजन, वाचा तिचा 'देसी' डाएट प्लॅन

​दुबईमधील स्वच्छतेचे ही निकिताने कौतुक केले आहे. ती म्हणते तिथे धूळ आणि प्रदूषणाची समस्या अजिबात जाणवत नाही. ज्या लोकांना स्वच्छता आवडते, त्यांच्यासाठी दुबई हे एखाद्या 'डिस्नी वर्ल्ड'सारखे आहे. तिथे वाहतुकीचे नियम इतके कडक आहेत की, अतिशय संथ गतीने गाडी चालवल्यास देखील दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे सर्व जण तिथल्या नियमाचे पालन करतात. नियम पाळणे ही आपली जबाबदारी समजतात. शिवाय कोणी ही व्यक्ती तिथे अस्वच्छता करताना दिसत नाही. त्यामुळे जनतेचाही सहभाग यात दिसून येतो. 

नक्की वाचा - Extra Marital Affair: विवाहबाह्य संबंधासाठी 'हे' शहर नंबर वन! मुंबई, पुणे, दिल्लीचा कितवा क्रमांक? पाहा यादी

​हा व्हिडिओ व्हायरल प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया ही उमटत आहेत. एका युझरने लिहिले आहे की "हे 100% सत्य आहे, यात काहीच चुकीचे नाही. दुबईला सलाम." त्याने यात दुबईच्या शिस्तीचे आणि स्वच्छतेचे कौतूक केले आहे. दुसऱ्या एका युझरने "मी माझ्या आयुष्यातील 19 वर्षे या सुंदर देशात घालवू शकलो, देवाचे आभार," अशी कमेंट केली आहे. दरम्यान, काही नेटकऱ्यांनी दुबई आणि भारताची लोकसंख्या आणि परिस्थिती वेगळी असल्याने अशी थेट तुलना करणे योग्य नसल्याचेही म्हटले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com