Mohan Bhagwat Gen Z Event: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडलेला जनरेशन झेड (Gen Z) चा विशेष संवाद कार्यक्रम सध्या जोरदार चर्चेत आला आहे. 13 ते 22 वर्षे वयोगटातील तरुणांच्या मनातील प्रश्नांना ऋषभ शाह नावाचा तरुण (Rishabh Shah Mohan Bhagwat interview) कोण, असा प्रश्न सध्या देशभरात विचारला जात आहे.
कोण आहे वृषभ शाह?
सरसंघचालकांची अत्यंत गाजलेली मुलाखत घेणारा ऋषभ शाह हा 'इंडियाज इंटरनॅशनल मूव्हमेंट टू युनायटेड नेशन्स' (IIMUN) या नामांकित आंतरराष्ट्रीय युवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष आहे. ऋषभने 2011 मध्ये या संस्थेची स्थापना केली आहे. तो फक्त तरुण उद्योजक नसून अनेक महाविद्यालयांमध्ये अभ्यागत प्राध्यापक (व्हिजिटिंग फॅकल्टी) म्हणूनही कार्यरत आहे. याशिवाय कौटुंबिक व्यवसाय सांभाळत तो सामाजिक कार्यात सक्रिय असतो आणि त्याने काही पुस्तकांचे लेखनही केले आहे. शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि तरुणांचे मानसिक आरोग्य यांसारख्या गंभीर विषयांवर तो नेहमीच राष्ट्रीय व्यासपीठांवर आपली भूमिका मांडत असतो.
( नक्की वाचा : Mohan Bhagwat: Gen-Z च्या आंदोलनावर मोहन भागवत काय म्हणाले? सरसंघचालकांचा सरकार अन् समाजाला 'हा' सल्ला )
IIMUN संस्था नक्की काय करते?
IIMUN ही 13 ते 22 वयोगटातील तरुणांमध्ये नेतृत्व आणि कूटनीतीचे कौशल्य विकसित करणारी जागतिक स्तरावरील मोठी संस्था आहे. शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मॉडेल युनायटेड नेशन्स (MUN), नेतृत्व विकास कार्यक्रम, साहित्य उत्सव आणि अभ्यास दौरे आयोजित करण्याचे काम ही संस्था करते.
यंदाचा मुंबईतील कार्यक्रम हा जगातील 15 देशांमधील 108 शहरांत पार पडलेल्या उपक्रमांचा सांगता समारंभ होता. ऋषभ शाह याने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 2016-17 आणि 2020-21 मध्येही मोहन भागवत या संस्थेच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले होते. यावेळच्या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे भाषणाऐवजी थेट प्रश्नोत्तरांचा संवाद घडवून आणण्यात आला.
( नक्की वाचा : CJP ची सप्टेंबरपासून देशाव्यापी 'क्या बोलती पब्लिक' मोहीम; अभिजीत दीपके 5 मोठ्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार )
कार्यक्रमात मोहन भागवत काय म्हणाले?
या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी आजच्या तरुण पिढीच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. आंदोलन करणे म्हणजे नवीन पिढी किंवा Gen Z राष्ट्रविरोधी आहे असा अर्थ होत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. लोकशाहीत आंदोलन हे संवादाचेच एक माध्यम असून आजचे तरुण आपल्या हक्कांसाठी प्रश्न विचारत आहेत. देशाच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल करण्याची गरज असून, तरुणांनी उपस्थित केलेले प्रश्न अत्यंत रास्त आहेत, असेही सरसंघचालक यावेळी म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world