Ayatollah Khamenei Death News : अमेरिका-इस्त्रायलने इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाचं पर्व सुरु झाल्याचं बोललं जात आहे. इराणनेही या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. याचदरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा केला आहे. इराणी माध्यमांनीही खामनेईचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलं आहे. अशातच आता इराणची सत्ता कोण सांभाळणार?असा सवाल उपस्थित केला जात आहे.
इराण लवकरच नव्या सर्वोच्च नेत्याची घोषणा करणार आहे. इराणच्या संविधानच्या 'विलायत-ए-फकीह'सिद्धांतानुसार, सर्वोच्च नेत्याचं पद मोठ्या धार्मिक विद्वान (मौलवी) यांनाच मिळू शकतो.यापूर्वी खामनेई यांनी त्यांच्या कोणत्याही उत्तराधिकाऱ्याचं नाव जाहीर केलं नव्हतं. खामनेई यांच्यानंतर इस्लामी गणराज्य इराणचे सर्वोच्च नेत्यांच्या रेसमध्ये दोन जणांच्या नावाची चर्चा आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुणे जिल्ह्याला मिळाली नवसंजीवनी, डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं सर्वत्र होतंय कौतुक, कारण..
त्या दोन नेत्यांच्या नावांची का होतेय चर्चा?
पहिलं नाव खामनेई यांचा मुलगा मोजतबा खामनेईचं आहे.तर दुसरं नाव इराणचे संस्थापक अयातुल्ला खामनेई यांचा नातू हसन खामनेई यांचं आहे. खामनेईंच्या मृत्यूनंतर या दोन नावांची चर्चा रंगली आहे. इराणच्या सत्तेचा निर्णय सल्लागार परिषदेकडून घेतला जातो. यामध्ये 88 मोठे धार्मिक विद्वान (मौलवी) सहभागी होतात. ही परिषदच अधिकृतपणे नव्या सर्वोच्च नेत्याची निवड करते. पण पडद्यामागे खरी ताकद त्या पॉवर ब्रोकर्सच्या हातात असते,जे देशाची व्यवस्था चालवतात.
नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणमध्ये बिस्मिल्ला मशिदीजवळ नागरिकांच्या जीवाशी खेळ, स्थानिक नगरसेविका उतरली मैदानात
इराणच्या सत्तेत IRGC ची महत्त्वाची भूमिका
इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) इराणच्या सरकारच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर काम करते. त्यांना थेट सर्वोच्च नेत्याला रिपोर्टिंग करावी लागते.ही देशाची सर्वात शक्तिशाली आणि सुसज्ज सैन्य शाखा आहे. रॉयटर्सनुसार, शनिवारी झालेल्या हल्ल्यात आयआरजीसी (IRGC) कमांडर मोहम्मद पाकपूरचाही मृत्यू झाला आहे. एक्स्पर्टचं म्हणणं आहे की, इस्लामी देशांच्या भविष्याला आकार देण्यासाठी आयआरजीसीची भूमिका महत्त्वाची ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world