पुढचा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंनी जाहीर पणे सांगितलं

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हेच आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. काही महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकीतही लोकसभे प्रमाणेच यश मिळवण्याचा मानस मविआचा आहे. याबाबत आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल हेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. शिवाय त्यांनी जे वक्तव्य केले आहे त्याचे काय पडसाद मविआमध्ये उमटतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर खासदारांचे सत्कार आयोजित केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांचे ही सत्कार होत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. उद्धव ठाकरें शिवाय पर्याय नाही. हे जनतेला आता समजले आहे. लोकसभा निवडणुकीत आपण जिंकणार हे आधीपासून सांगत होतो. आता विधानसभेलाही महाविकास आघाडी जिंकणार आहे. पुढचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच होईल असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. आघाडीचा मुख्यमंत्री होईल हे सांगताना उद्धव ठाकरें शिवाय पर्याय नाही हे सांगायला ते मात्र विसरले नाहीत.   

ट्रेंडिंग बातमी -  रक्षा खडसे केंद्रात मंत्री झाल्या, पहिल्यांदाच जळगावात आल्या, सर्वात आधी काय केलं?

इंडिया आघाडीबाबत मोठं वक्तव्य    

लोकसभा निवडणूक आपण जिंकून दाखवली आहे. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये जागांमध्ये जास्त अंतर नाही. सध्या तरी इंडिया आघाडीचे सरकार बनलेले नाही. पण येणाऱ्या काही काळात दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार असेल असे वक्तव्य करून आदित्य यांनी भाजपवर कुरघोडी केली आहे. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार यावे यासाठी बोलणीही सुरू असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सध्या जरी भाजपचे सरकार केंद्रात असले तरी इंडिया आघाडीच्या अजूनही सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागून हालाचील सुरू असल्याचेच संकेत त्यांनी दिले.

ट्रेंडिंग बातमी - विधानसभा निवडणुकी आधीच ठाकरेंना शिंदेंचा दणका, बडा नेता गळाला

'हा तर देशाचा विजय' 

लोकसभेत झालेला विजय हा देशाचा विजय आहे. हुकुमशहाचा हा पराभव आहे असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. देशाच्या हुकुमशाहाला 303 जागांवरून 240 वर इंडिया आघाडीने खेचले आहे. राज्यात शिवसेनेनं कुठून सुरूवात केली यावरही त्यांनी भाष्य केले. शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 12 खासदार पळावे. त्यांच्याबरोबर 40 आमदारही पळाले. 40 नगरसेवक पळवले. काहींना पैसे दिले तर काहींना केसेमध्ये गुंतवले. असा आरोपही ठाकरेंनी केली. अशा स्थितीत निवडणुकीला सामोरे गेले. त्यात 9 खासदार निवडून आणले. तर अमोल कीर्तिकरही खासदार होतील असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Advertisement