Political Explainer : छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान का मिळू शकतं? 5 कारणे समजून घ्या

Chhagan Bhujbal News : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ आधीच नाराज होते. यामुळे छगन भुजबळ यांना यानिमित्ताने मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते.

जाहिरात
Read Time: 3 mins

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर वाढता विरोध लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य सरकारमधील अन्न व पुरवठा मंत्री हे पद रिक्त झालं आहे. या जागेवर राष्ट्रवादीने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागू शकते. मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ आधीच नाराज होते. यामुळे छगन भुजबळ यांना यानिमित्ताने मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांची नाराजी दूर केली जाऊ शकते. याशिवाय छगन भुजबळ धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात जागा का घेऊ शकतात, याची कारणे समजून घेऊयात.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादीतील ओबीसी चेहरा

राजकारणारणात जातीच्या राजकारणाला महत्त्व असतं. त्यामुळे धनंजय मुंडेंसारख्या ओबीसी नेत्याच्या जागी दुसऱ्या ओबीसी नेत्यांला मंत्रिमंडळात स्थान देण्याकडे अजित पवारांचा कल असेल. कारण छगन भुजबळ यांच्या मागे ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात उभा आहे. याचा फायदा पक्षाना नक्कीच होईल. त्यामुळे मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांची पोकळी छगन भुजबळ भरून काढू शकतात.

Advertisement

पक्षाला अडचणीत आणणारी भूमिका घेतली नाही

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते आहे. मात्र तरीदेखील त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. असं असलं तरी छगन भुजबळ यांनी बंडाचं निशाण उगारलं नाही. पक्षाला अडचणीत आणणारी कोणतीही भूमिका भुजबळांनी मागील 3 महिन्यात घेतली नाही. भुजबळांनी आपली नाराजी अनेकदा उघड बोलून दाखवली, मात्र बंडखोरी न करता पक्षासोबतची निष्ठा कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी पक्षात फुट पडली त्यावेळीही भुजबळांनी शरद पवारांऐवजी अजित पवारांना साथ दिली होती. या निष्ठेची परतफेड करण्याची संधी अजित पवारांकडे आहे. 

Advertisement

(नक्की वाचा-  संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)

भाजपसोबतची वाढती जवळीक

छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर त्यांची भाजप सोबतची जवळीक वाढल्याचं बोललं जात होते. भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट देखील घेतली होती. भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा होती. त्यामुळे भुजबळांसारखा नेता साथ सोडू नये यासाठी देखील त्यांना मंत्रिपद देऊन पक्षासोबत सन्मानाने ठेवण्याची भूमिका अजित पवार घेऊ शकतात.

Advertisement

दांडगा अनुभव अन् प्रशासनावरील पकड 

महायुती सरकारमधील सर्वात अनुभवी नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचा समावेश होतो. धनंजय मुंडे यांच्याकडे असलेल्या अन्न व पुरवठा विभागाचं मंत्रिपद देखील भुजबळांनी सांभाळलं आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारच्या भुजबळांकडे या विभागाची जबाबदारी होती. त्यामुळे या रिक्त मंत्रिपदासाठी भुजबळाचा विचार केला जाऊ शकतो.

(नक्की वाचा- विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाकडून नाव निश्चित, आदित्य नाही तर 'या' नेत्यावर शिक्कामोर्तब)

 नाशिक विभागातून मंत्रिमंडळातील चेहरा 

विद्यमान माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर देखील टागंती तलवार आहे. अशावेळा मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ हे नाशिक विभागाचं प्रतिनिधित्व करू शकतात.  दादा भुसे आणि सुहास कांदे यांना ताकदे देऊन शिवसेना शिंदे गट नाशिकमध्ये विस्तार करतोय हे उघड सत्य आहे. नाशिकमध्ये याचा फटका राष्ट्रवादी बसू शकतो. त्यामुळे पक्षाला नाशिक विभागात भविष्यात होणारी हाणी कमी करायची असेल तर माणिकराव कोकाटेंच्या जागी भुजबळांना संधी देणे कधी फायदेशीर ठरु शकते. मात्र मंत्रिमंडळात मुंडेंच्या जागी कुणाला संधी मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल.