वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नंबर प्लेट बसवणे अनिवार्य झाले आहे. वाहनांची सुरक्षा वाढवणे आणि वाहन चोरीच्या घटना रोखण्याच्या उद्देशाने सरकारने HSRP नंबर प्लेट बसवणे सक्तीचे केले आहे. वाहनाला HSRP नसेल वाहन चालकांना दंड भरावा लागू शकतो. दंडाची रक्कम विविध राज्यांमध्ये वेगवेगळी असू शकते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
HSRP म्हणजे काय?
एचएसआरपी नंबर प्लेट ही एक विशेष प्रकारची हाय सिक्युरिटी प्लेट आहे. क्रोमियम-आधारित होलोग्राम या प्लेटमध्ये असल्याने छेडछाड रोखण्यासाठी वाढीव सुरक्षा मिळते. 10 अंकी पिन कोड जो वाहनाचा युनिक कोड असणार आहे.
HSRP प्लेट्स स्टीलच्या बनवलेल्या असतात आणि त्यांच्यावर लेसर-प्रिंट केलेले क्रमांक असतात, ज्यामुळे त्यांची कॉपी करणे कठीण होते. एकदा लावल्यानंतर, कोणतेही नुकसान न होता ते काढणे कठीण आहे. ज्यामुळे गुन्हेगारांना नंबर प्लेट बदलण्याची संधी मिळणे कठीण होईल.
ट्रेंडिंग बातमी - वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च येणार? वाचा दर
HSRP नंबर प्लेट वापरण्याचे फायदे
HSRP नंबर प्लेट बदलायची असेल तर ती तोडण्याशिवाय पर्याय नसेल. त्यामुळे वाहन चोरीला जाणे कठीण आहे. कोडिंग सिस्टममुळे स्कॅनिंग केल्यानंतर लगेचच वाहनाशी संबंधित माहिती उपलब्ध होते. प्लेटवर लिहिलेल्या नोंदणी क्रमांकात कोणताही बदल करता येणार नाही. नंबर प्लेट हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यांच्या नजरेत लगेचच येते. क्यूआर कोडमधून डेटा वाचणे सोपे आहे. अपघात झाल्यास, वाहन मालकाची संपूर्ण माहिती क्यूआर कोडद्वारे काही सेकंदात उपलब्ध होते.
ट्रेंडिंग बातमी- वाहनांना HSRP नंबर प्लेट कधीपर्यंत बसवता येणार? मुदतवाढीबाबत परिवहन आयुक्तांचं मोठं वक्तव्य
HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत कधीपर्यंत?
HSRP नंबर प्लेट लावण्याचं काम सुरू झालं आहे. याची मुदत 30 एप्रिलपर्यंत आहे. केंद्रीय मोटार नियम 1989 च्या नियमानुसार सर्व वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' लावणं बंधनकारक आहे. ज्यांनी 1 एप्रिल 2019 नंतर गाड्या खरेदी केल्या आहेत अशा गाड्यांना HSRP नंबर प्लेट आहेत. मात्र त्या आधीच्या गाड्यांना या नंबर प्लेट नाहीत. अशा सर्व गाड्यांना आता यानंबर प्लेट लावाव्या लागणार आहेत.