जाहिरात

वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च येणार? वाचा दर

HSRP price list : केंद्रीय मोटार नियम 1989 च्या नियमानुसार सर्व वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ' बसवणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात येत आहे.

वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी किती खर्च येणार? वाचा दर

देशातील बहुतेक राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी असलेल्या जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातही 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी लावण्याचे काम सुरू आहे. राज्यातील दुचाकी, तीन चाकी, चार चाकी व जड वाहनांसाठी हे नंबर प्लेट लावण्याचे दर अन्य राज्यांमधील दराप्रमाणेच आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट  लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. उच्चाधिकार समितीने  कंपन्यांचे दर अंतिम केले आहेत. मान्य झालेल्या दरानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने कार्यारंभ आदेश जारी केले. राज्यात ठरवून दिलेले दर हे 'एचएसआरपी ' नंबर प्लेट व फिटमेंट चार्जेससह आहेत.

(नक्की वाचा-  Pune Swargate Bus Depot Case : शेकडो पोलिसांची फौज, श्वान पथक, ड्रोन... दत्तात्रय गाडे पोलिसांना कसा सापडला?)

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेटसाठी किती खर्च?

अन्य राज्यात जीएसटी वगळून दुचाकीचे दर प्रतिवाहन 420 ते 480 रुपये, तीन चाकी वाहन 450 ते 550, चार चाकी वाहन व जड वाहने 690 ते 800 रुपये आहेत. तर राज्यात जीएसटी वगळून दुचाकी प्रतिवाहन 450 रुपये, तीन चाकी 500 रुपये, चार चाकी व जड वाहने 745 रुपये आहे. यावरून राज्यातील दर अन्य राज्यांमधील दरांप्रमाणेच असल्याचे दिसून येते.

(नक्की वाचा- Rule Change 2025: आजपासून हे नियम बदलले, तुमच्या खिशावर कसा होईल परिणाम?)

केंद्रीय मोटार नियम 1989 च्या नियमानुसार सर्व वाहनांना 'हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ' बसवणे बंधनकारक आहे. वाहन विक्रेत्याकडून 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात येत आहे. मात्र 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबर प्लेट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार लावणे बंधनकारक आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: