
मी मराठीत का बोलू? मराठी बोलायची जबरदस्ती आहे का? मराठी बोलायला तू काय महाराष्ट्र खरेदी केला का? ही वाक्य कुठे परदेशात, परराज्यात नाही तर महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत बोलली गेली आहेत. होय मराठी माणासाच्या महाराष्ट्राच्या राजधानीत बोलली गेली आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ही मराठी का बोलू हे बोलण्याची हिंम्मत मराठीचा द्वेष करणारे परप्रांतिय करताना मुंबईत दिसत आहेत. मुंबईच्या चारकोपमध्ये हा सर्व प्रकार समोर आला असून संबंधीत मराठी द्वेष्ट्या तरुणीचा व्हिडीओ आता चांगलात व्हायरल होत आहे. यात ती मराठी बरोबर महाराष्ट्राचाही अपमान करताना दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चारकोपमध्ये एका मोबाईल कंपनीची गॅलरी आहे. इथं एक मराठी तरुण आपली तक्रार घेवून गेला होता. तिथं काम करणारी एक परप्रांतीय तरुणी कामाला होती. ती मराठी बोलणाऱ्या तरुणाबरोबर उद्धट पणे बोलत होती. तो तरुणी मराठी बोल अशी विनंती करत होती. पण तिचा व्होरा थोडा वेगळा होता. मला मराठी येत नाही. मी मराठी बोलणार नाही. मराठी का बोलायचं? तुम्ही सांगणार म्हणून मराठी बोलायचं का? मी का मराठी बोलू? अशा पद्धतीची अर्वाच्च आणि उद्धट उत्तर ती देत होती.
तिचं येवढ्यावर भागलं नाही. मराठी बोलायला महाराष्ट्र खरेदी केला का? असा अलट सवाल निर्लज्जपणे तिने त्या मराठी तरुणाला केला. त्यानंतर त्याचा ही पारा चढला. माझी तक्रार बाजूला जावू दे तू आधी मराठी बोल असा आग्रह त्याने धरला. त्याला त्या गॅलरीमध्ये असलेल्या अन्य एका तरुणाचीही साथ मिळाली. त्या तरुणीने पोलिसांना बोलावण्याची धमकी ही दिली. पोलिसांना बोलव, असं प्रति आव्हान त्या मराठी तरुणाने त्या तरुणीला दिलं. पण गॅलरीत एक पुरूष कर्मचारी आला. मी तुमची समस्या सोडवतो सांगून त्याने प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद होत होता. आता हा व्हिडीओ वाऱ्या सारखा व्हायरल झाला आहे. याबाबत प्रचंड संताप आणि राग व्यक्त केला जात आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या या मोबाईल कंपनीत्या गॅलरीतील कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा मुंबईत या कंपनीची गॅलरी दिसणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी दिला आहे. मनसेने ही हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियीवर शेअर केला आहे. यानंतर संबधीत कंपनीला जाग आली आहे. त्यांनी त्या तरुणीला नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय यापुढे असं होणार नाही याची हमी ही घेतली आहे. शिवाय जो मराठीचा अपमान झाला आहे त्याबाबत लेखी माफीनामा ही दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world