जाहिरात

मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला यशस्वी होणार का? तज्ज्ञांना काय वाटतं?

Manoj Jarange Politics : मुस्लीम उमेदवार निवडून आणण्याबरोबरच मुस्लीम समाजाचा उद्दिष्ट म्हणजे भाजपला हरवणे आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांचे उद्दिष्ट देखील भाजपला हरवणे आहे, ते का याचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

मनोज जरांगे यांचा MMD फॉर्म्युला यशस्वी होणार का? तज्ज्ञांना काय वाटतं?


मनोज जरांगे यांच्याकडून आज विधानसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात उमेदवार रिंगणात उतरवणार याची घोषणा केली जाणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी त्यांनी वेगवेगळ्या धर्मगुरू यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मुस्लीम, मराठा, दलित म्हणजेच MMD समीकरण जुळले आहे, त्यानुसार निवडणूक उमेदवार उतरवणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, खरचं एमएमडी फॉर्म्युला यशस्वी होणार का? याबाबत एनडीटीव्ही मराठीने मराठा अभ्यासकांचे मत जाणून घेतलं. ज्यात बाळासाहेब सराटे यांनी देखील आपली भूमिका मांडली. 

बाळासाहेब सराटे यांनी म्हटलं की, मनोज जरांगे यांनी आपली भूमिका बदलून आता जनसामान्यांचे नेते म्हणून समोर आले आहेत. तर हे एमएमडी असे नसून, मुस्लीम, मराठा आणि बौद्ध असा तो फॉर्म्युला आहे. मात्र, मराठ्यांच्या दृष्टीने हा 'एमएमडी फॅक्टर' या निवडणुकीत फारशी प्रभावी ठरणार नाही. त्याची काही कारणं देखील आहे. 

"सज्जद नोमानी यांनी राज्यातील 25 मुस्लीमबहुल मतदारसंघात मुस्लीम उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. त्यातील काही मतदारसंघात एमआयएमचे उमेदवार आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे उघडपणे एमआयएमला आमचा पाठिंबा असून, त्यांच्या उमेदवार निवडून आणावे असे म्हणणे शक्य नाही. विशेष म्हणजे हे मुस्लीम समाजाला देखील माहीत आहे. त्यामुळे अशा मतदारसंघात मराठा उमेदवार दिला पाहिजे अशी मागणी मुस्लिमांची असणार, कारण मुस्लीम समाजाला प्रतिनिधित्व मिळावे हे त्यामागील उद्दिष्ट आहे, असं सराटे म्हणाले.  

भाजपला हरवणे समान उद्दिष्ट? 

मुस्लीम उमेदवार निवडून आणण्याबरोबरच मुस्लीम समाजाचा उद्दिष्ट म्हणजे भाजपला हरवणे आहे. दुसरीकडे मनोज जरांगे यांचे उद्दिष्ट देखील भाजपला हरवणे आहे, ते का याचे उत्तर अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे मुस्लीम समाज आणि मनोज जरांगे यांचं भाजपला हरवण्याचं समान उद्दिष्ट पाहायला मिळतं. 

मराठा समाज मुस्लीम उमेदवाराला मत देणार का? 

काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे किंवा भाजपकडून मुस्लीम उमेदवार देण्यात आला तर मराठा समाज नक्की त्या मुस्लीम उमेदवाराला मतदान करतील. पण याचवेळी एमआयएमच्या मुस्लीम उमेदवाराला मराठा समाज मतदान देणार नाही. मराठा समाज जातिवाद करत नाही, पण विश्वासार्हता पाहतो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: