शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने अटल सेतूवरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र कॅब चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मोठ्या हिमतीने कॅब चालकाने पोलिसांच्या मदतीने महिलेचा जीव वाचवला आहे. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय यादव हा कॅब ड्रायव्हर या महिलेला घेऊन मुलुंड येथून निघाला होता. या महिलेने आपल्याला काही देवाचे फोटो विसर्जन करायचे असल्याचे सांगत अटल सेतूवर गाडी घेण्यास सांगितले. दरम्यान महिलेने ड्रायव्हरला गाडी अटल सेतूवर बाजूला थांबवण्यास सांगितली. मात्र कॅब ड्रायव्हरने गाडी बाजूला लावू शकत नसल्याचे वारंवार सांगत असतानाही महिलेने त्याला जबरदस्तीने गाडी बाजूला लावण्यात सांगितले. त्यामुळे काहीतरी गडबड असल्याचे त्याला जाणवले होते.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
गाडी बाजूला थांबवताच महिला गाडीतून खाली उतरली. त्यामुळे ड्रायव्हरही गाडीतून खाली उतरला आणि महिलेच्या जवळच उभा राहिला. अटल सेतूवर लावलेल्या कॅमेरामुळे पोलिसांच्या देखील दोघे थांबल्याचं दिसलं. त्यावेळी पेट्रोलिंक करणारे पोलिसांनाही काहीतर गडबड असल्याचं जाणवल्याने घटनास्थळी पोहोचले. पोलीस येत असल्याचे लक्षात येताच महिलेने पुलावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी बाजूला उभ्या असलेल्या ड्रायव्हर संजय यांनी महिलेच्या केसांना घट्ट धरून ठेवले. त्यानंतर पोलीस देखील धावले आणि महिलेला पकडून वर आणले.
(नक्की वाचा- शिवसेना नेत्याचं काँग्रेसमधून निलंबन; पक्षात नसतानाही पक्षविरोधी काम केल्याचा ठपका)
अशारितीने कॅब ड्रायव्हर संजय यादव आणि पोलीस शिपाई मयूर पाटील, ललित शिरसाठ, किरण म्हात्रे, यश सोनवणे यांनी मोठ्या शिताफीने महिलेचे प्राण वाचवले. या घटनेनंतर महिलेला नवी मुंबई पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महिलेच्या कुटुंबीयांनाही या घटनेची माहिती देण्यात आली.