देवेंद्र कोल्हटकर, मुंबई
सायन हॉस्पिटलमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सायन हॉस्पिटल परिसरात एका महिला रुग्णाला कारने चिरडल्याची घटना समोर आली आहे. महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कार चालक डॉ. राजेश ढेरे यांच्याविरोधात सायन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रुबेदा शेख असं या 60 वर्षीय महिलेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुबेदा यांचं 16 मे रोजी सायन रुग्णालयात ऑपरेशन झालं होते. ऑपरेशन झाल्यानंतर शुक्रवारी त्या ड्रेसिंगसाठी पुन्हा रुग्णालयात आल्या होत्या. ड्रेसिंग झाल्यानंतर त्या सायन रुग्णालय परिसरतात गेट नंबर 7 येथे झोपल्या होत्या.
(नक्की वाचा - Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल? )
त्याचवेळी डॉ. राजेश ढेरे हे देखील रुग्णालयातून बाहेर पडत होते. मात्र रुबेदा या रस्त्यात झोपल्या आहेत, याचा अंदाज न आल्याने डॉ. राजेश ढेरे यांनी कार रुबेदा यांच्या अंगावर चढवली. त्यावेळी आजूबाजूचे सर्वजण मदतीला धावले आणि रुबेदा यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
(नक्की वाचा - एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनो सावधान! मध्य रेल्वेचे मोठे पाऊल)
अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमैऱ्यात कैद झाली आहे. मात्र उपचारादरम्यान रुबेदा यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉ. राजेश ढेरे यांच्यावर सायन पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्यांना शनिवारी अटक केली आहे.