रेवती हिंगवे
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर भारत पाक सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तान कडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यात निष्पाप लोक मारले जात आहेत. एक युद्ध मैदानात लढले जात आहे. तर दुसरे युद्ध हे सोशल मीडियावर ही होताना दिसत आहे. त्यातून वाद होतानाही दिसत आहे. काही जण आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर करत आहेत. पुण्यातील सिंहगड महाविद्यालयात शिकणाऱ्या खदिजा शेख या विद्यार्थिनीने ही अशीच एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्यामुळे तिला थेट जेलची हवा खावी लागली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात वास्तव्यास असलेल्या एका तरुणीने सोशल मीडियावर 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देणारी पोस्ट शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. सकल हिंदू समाजाने ही माहिती एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी आता पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तरुणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग बातमी - Operation Sindoor: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? काय केली होती भविष्यवाणी?
सकल हिंदू समाजाने असं सांगितलं आहे की, पुण्यात शिक्षण घेणारी ही तरुणी तिच्या इंस्टाग्राम हँडलवरून पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट लिहित होती. तिने 'पाकिस्तान जिंदाबाद' ही घोषणा 100 वेळेस लिहिल्याचा दावा ही सकल हिंदू समाजाने केला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिने तिचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केलं असं ही सकल हिंदू समाजाचे म्हणणे आहे. मात्र, या प्रकरणाने सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले आहे.
याबाबतची तक्रारही पोलिसामध्ये दाखल करण्यात आली. त्यासोबतच पुण्यातील कोंढवा पोलिसांनी खदिजा शेखला अटक करत तिच्या विरोधात गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. रत्नागिरीत ही एका तरुणाने त्याच्या सोशल मीडियावर पाकिस्तानचा उदो उदो केला होता. त्यावेळी त्याला तिथल्या स्थानिकांनी शोधून कपडे फाटेपर्यंत चोप दिला होता. शिवाय पोलिसात ही दिले होते.