जाहिरात

Zero Shadow Day: सज्ज व्हा! मे महिन्यात 2 वेळा घडणार ही गूढ घटना, पुणे-मुंबई ठाण्यासह 22 शहरांच्या तारखा तपासा

Zero Shadow Day 2026: महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरामध्ये एक गूढ घटना दोनदा घडणार आहे. पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांचे वेळापत्रक आणि यामागचे खगोलशास्त्रीय कारण सविस्तर वाचा.

Zero Shadow Day: सज्ज व्हा! मे महिन्यात 2 वेळा घडणार ही गूढ घटना, पुणे-मुंबई ठाण्यासह 22 शहरांच्या तारखा तपासा
"Zero Shadow Day 2026: गूढ घटना अनुभवण्यासाठी सज्ज व्हा"
Envato

Zero Shadow Day 2026: खगोलप्रेमींसाठी 2026मधील मे महिना अतिशय खास ठरणार आहे. वर्षातून एकदा येणारा 'शून्य सावलीचा दिवस' (Zero Shadow Day) पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगानुसार (पुणे), महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मे महिन्यात सूर्य बरोबर डोक्यावर येणार असून काही क्षणांसाठी तुमची सावली पूर्णपणे अदृश्य होणार आहे. याबाबत पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...

काय आहे यामागील शास्त्र?

खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तरपृथ्वीचा अक्ष 23.5 अंशाने कललेला आहे. सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे (उत्तरायण) जेव्हा सूर्याची क्रांती (Declination) तुमच्या शहराच्या अक्षांशाशी (Latitude) तंतोतंत जुळते, तेव्हा सूर्य मध्यान्हाच्या वेळी बरोबर तुमच्या ख-मध्यावर (Zenith) असतो. या स्थितीत सूर्यकिरणे पृथ्वीवर लंबवत पडतात आणि आपली सावली काही क्षणांसाठी पूर्णपणे अदृश्य होऊन आपल्या पायाखाली येते.

(नक्की वाचा: 7 May 2026 Panchang: आज सकाळी 7:42 वाजेनंतर वेळ बदलणार, काय घडणार? पंचांगातील या बदलांकडे दुर्लक्ष करू नका)

उत्तर भारतात शून्य सावली कधीच का अनुभवता येत नाही?

दिल्ली, जयपूर, चंदीगड किंवा श्रीनगर यासारख्या शहरांमध्ये शून्य सावली कधीच अनुभवता येत नाही. याचे कारण ही शहरे कर्कवृत्ताच्या (23.5° N) पलीकडे आहेत. सूर्य जास्तीत जास्त कर्कवृत्तापर्यंतच डोक्यावर येऊ शकतो. त्यापुढे तो नेहमी दक्षिण दिशेला कललेलाच असतो.

(नक्की वाचा: 7 Horses Painting Direction: घराच्या या भिंतीवर 7 पांढऱ्या घोड्यांचा फोटो लावणं ठरेल विनाशाला निमंत्रण; वास्तूशास्त्राचा नियम पाळा अन्यथा..)

शून्य सावलीचा प्रयोग कसा करायचा?
  1. दुपारी 12 वाजेच्या सुमारास कडक उन्हात एक उभी काठी किंवा पाण्याचा पाइप सपाट जमिनीवर ठेवा.
  2. वरील टेबलमध्ये दिलेल्या तुमच्या शहराच्या तारखेनुसार निरीक्षण करा.
  3. एका विशिष्ट क्षणी त्या काठीची सावली पूर्णपणे नाहीशी झालेली तुम्हाला दिसेल.
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तारखा जाणून घ्या | Zero Shadow Day 2026 City Wise Dates

  • मुंबई: 15 मे आणि 28 जुलै 
  • पुणे: 13 मे आणि 30 जुलै
  • ठाणे-कल्याण: 16 मे आणि 27 जुलै
  • कोल्हापूर: 6 मे आणि 6 ऑगस्ट
  • सांगली-मिरज: 7 मे आणि 5 ऑगस्ट
  • सातारा: 10 मे आणि 2 ऑगस्ट
  • सोलापूर: 10 मे आणि 2 ऑगस्ट
  • लातूर: 13 मे आणि 30 जुलै
  • अहमदनगर-नांदेड: 16 मे आणि 27 जुलै
  • नाशिक-छत्रपती संभाजीनगर-जालना: 19 मे आणि 24 जुलै
  • चंद्रपूर: 20 मे आणि 23 जुलै
  • अकोला-वर्धा: 23 मे आणि 20 जुलै
  • जळगाव-भुसावळ-अमरावती: 25 मे आणि 18 जुलै
  • नागपूर: 26 मे आणि 17 जुलै

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com