
Abhishek Sharma Networth News: आशिया चषक 2025 मध्ये टीम इंडियाकडून चमकदार कामगिरी करणारा युवा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या चर्चेत आहे. त्याने प्रत्येक सामन्या आपली छाप पाडलेली दिसते. खास करून पाकिस्तान विरुद्ध त्याची बॅट चांगलीच तळपली होती. 25 वर्षांच्या या खेळाडूने पाकिस्तान आणि त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सुपर 4 सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावून आपली फलंदाजीतील क्षमता सिद्ध केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळेच तो 907 रेटिंग गुणांसह ICC T-20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. जगातला तो अव्वस क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. कमी वेळात त्याने हे यश मिळवलं आहे. अशा वेळी त्याची एकूण संपत्ती किती याची ही चर्चा सुरू झाली आहे. त्याचीच आपण आज माहिती घेणार आहोत.
अभिषेक शर्माचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण 2024 मध् केले होते. त्याच्या सातत्यपूर्ण खेळाचा परिणाम म्हणून, 2025 पर्यंत त्याला बीसीसीआयने ग्रेड C चे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या करारानुसार, त्याला वार्षिक 1 कोटी रुपये मिळतात. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टव्यतिरिक्त, त्याला प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी बोर्डाकडून प्रति सामना 3 लाख रुपये मिळतात. पाकिस्तानविरुद्ध 74 धावांची खेळी केल्यानंतर त्याला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यासाठी त्याला वेगळे बक्षिसही मिळाले होते.
अभिषेक शर्माच्या कमाईचा मोठा स्रोत म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL) आहे. IPL 2025 साठी सनरायझर्स हैदराबादने त्याला 14 कोटी रुपयांना रिटेन केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमृतसरचा रहिवासी असलेल्या या युवा खेळाडूची एकूण संपत्ती 25 ते 30 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. त्याच्याकडे अलिशान अशी BMW 320d आणि BMW 3 सीरिज सारखी आलिशान वाहने आहेत. अमृतसरमध्ये त्याचा आलिशान बंगला आहे. तो रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करत आहे. भविष्यात ब्रँड एंडोर्समेंट मिळाल्यास त्याच्या संपत्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
ज्या पद्धतीने अभिषेक शर्मा यशाच्या शिखरावर चढत आहे हे पाहाता संपत्तीच्या आणखी शिखरावरही तो वर चढतच राहील अशी स्थिती आहे. अभिषेक शर्माच्या कामगिरीवर सध्या सर्व क्रिकेट जगत खुश आहे. माजी क्रिकेटपटूनी तर त्याचे तोंड भरून कौतूक केलं आहे. अभिषेक शर्माचा चेहरा एखाद्या नायका सारखा वाटतो. त्यामुळे त्याला आगामी काळात मोठ्या प्रमाणात जाहीराती मिळण्याचीही दाट शक्यता आहे. त्यातून ही त्याचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे आपोआपच त्याच्या संपत्तीत वाढ होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world