जाहिरात

Asia Cup Final 2025: आशिया कपच्या फायनलमध्ये भारत- पाक भिडणार! कसं जुळणार महामुकाबल्याचे समीकरण?

Asia Cup Final 2025 India Vs Pakistan Fight: आजच्या सामन्यात ते बांगलादेशलाही हरवतील (Bangladesh) अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या स्पर्धेत दोन्ही संघांोमध्ये अंतिम लढत होण्याची शक्यता बळावली आहे.

Asia Cup Final 2025: आशिया कपच्या फायनलमध्ये भारत- पाक भिडणार! कसं जुळणार महामुकाबल्याचे समीकरण?

Asia Cup 2025 Final India VS Pakistan Match: आशिया कपचा १७ वा सिझन अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेमध्ये आता केवळ तीन सामने शिल्लक आहेत. एक सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात, तर दुसरा भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला जाईल. सुपर-४ मधील आपले दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून भारतीय संघाने अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तर, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात जो संघ जिंकेल, तो अंतिम सामन्यात भारतीय संघाला आव्हान देईल. या स्पर्धेत पाकिस्तानने टीम इंडिया वगळता इतर संघांविरुद्ध ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यावरून आजच्या सामन्यात ते बांगलादेशलाही हरवतील ( Pakistan Vs Bangladesh) अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या स्पर्धेत दोन्ही संघामध्ये अंतिम लढत होण्याची शक्यता बळावली आहे.

पाकिस्तानची कामगिरी बांगलादेशपेक्षा सरस| 

सामन्याचा निकाल येण्याआधीच पाकिस्तान (Pakistan) जिंकेल असा अंदाज लावण्यामागे दोन्ही संघांचे आकडेवारीतील रेकॉर्ड आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान, पाकिस्तानला २० सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे, तर बांगलादेशचा संघ फक्त ५ सामन्यांमध्येच विजय मिळवू शकला आहे.

या स्पर्धेत केवळ गोलंदाजीच नाही, तर पाकिस्तानची फलंदाजीही बांगलादेशपेक्षा खूप मजबूत दिसत आहे. पाकिस्तानकडे साहिबजादा फरहान, फखर जमान, मोहम्मद हारिस आणि सईम अयूबसारखे स्फोटक फलंदाज आहेत. त्याच वेळी, मधल्या फळीत कर्णधार सलमान अली आगा, हसन नवाज, हुसैन तलत आणि खुशदिल शाह यांसारखे चांगले खेळाडू आहेत, जे डाव सावरण्यासोबतच गरज पडल्यास वेगाने धावा करण्यातही माहीर आहेत. यामुळेच आजच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

आशिया कप २०२५ च्या १६ सामन्यानंतरची गुणतालिकेची स्थिती| Asia Cup 2025 Super Four Points Table

भारत - दोन सामने - दोन विजय - चार गुण (१.३५७)

पाकिस्तान - दोन सामने - एक विजय - एक पराभव - दोन गुण (०.२२६)

बांगलादेश - दोन सामने - एक विजय - एक पराभव - दोन गुण (-०.९६९)

श्रीलंका - दोन सामने - दोन पराभव - शून्य गुण (-०.५९०)

२८ सप्टेंबर रोजी होणार अंतिम सामना| Asia Cup 2025 Final Match Details)

दरम्यान, आशिया कप २०२५ चा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळला जाईल. आगामी सामन्यासाठी भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे, तर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यात जो संघ जिंकेल, तो दुसऱ्या संघाच्या रूपात अंतिम फेरीत प्रवेश करेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com