
IPL 2025: एकाना स्टेडियमवर झालेल्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबादमधील सामन्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हैद्राबादचा फलंदाज अभिषेक शर्मा आणि लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठीमध्ये हा गोंधळ झाला. दोघांमधील वाद इतका टोकाला पोहोचला की लखनौ सुपर जायंट्सच्या संपूर्ण संघाला आणि मैदानी पंचांना हस्तक्षेप करावा लागला. हा संपूर्ण वाद दिग्वेश राठीने अभिषेक शर्माची विकेट घेतल्यानंतर झाला. विकेट घेतल्यानंतर दिग्वेशने केलेल्या सेलिब्रेशनवर अभिषेकने नाराजी दर्शवली आणि पॅव्हेलियनमध्ये जाताना त्याने गोलंदाजाला इशारा केला. यावरुनच दोन्ही खेळाडू मैदानावर भिडले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा संपूर्ण वाद अभिषेक शर्माच्या विकेटने सुरू झाला. हैदराबादच्या डावातील आठवे षटक टाकण्यासाठी आलेल्या दिग्वेश राठीने षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर अर्धशतक झळकावणाऱ्या अभिषेकला आपल्या जाळ्यात अडकवले. अभिषेकला दिग्वेशचा गुगली बॉल समजला नाही आणि त्याने ऑफ साईडवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वीप कव्हरवर त्याचा झेल पडला. त्यानंतर दिग्वेश राठीने अभिषेकला पॅव्हॅलियनमध्ये जाण्याचा इशारा केला आणि त्याचे नोटबुक सेलिब्रेशन केले.
Fight between Digvesh Rathi and Abhishek Sharma 😳 pic.twitter.com/8ngcvpnIVK
— 𝑺𝒉𝒆𝒓𝒂 (@SheraVK18) May 19, 2025
अभिषेकला दिग्वेशचे बोलणे खटकले आणि तो मैदानावरुन जाताना निघताना त्याने गोलंदाजाला काहीतरी इशारा केला. यानंतर अभिषेक गोलंदाजाकडे गेला तेव्हा दिग्वेशही मागे हटला नाही. यानंतर दोघांमध्ये बराच वाद झाला. हा वाद इतका वाढला की लखनौ सुपर जायंट्सच्या इतर खेळाडूंना आणि मैदानावरील पंचांना हस्तक्षेप करावा लागला. दोघेही मैदानावर हुज्जत घालताना दिसले. आता या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, या सामन्यात अभिषेक शर्माने 20 चेंडूंचा सामना केला आणि त्याच्या खेळीदरम्यान त्याने चार चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 59 धावा केल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world