जाहिरात

Cricket News: आयुष म्हात्रेला सचिन तेंडुलकर भेटला, मोलाचा सल्ला काय दिला? भेट वस्तूची सगळीकडेच चर्चा

या भेटीदरम्यान सचिनने आयुषला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि क्रिकेटमधील काही बारकावेही समजावून सांगितले.

Cricket News: आयुष म्हात्रेला सचिन तेंडुलकर भेटला, मोलाचा सल्ला काय दिला? भेट वस्तूची सगळीकडेच चर्चा
  • आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारताच्या अंडर १९ क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकून मोठी कामगिरी केली
  • सचिन तेंडुलकर यांनी आयुषला त्यांची शेवटची कसोटी क्रिकेट जर्सी भेट दिली
  • सचिनने आयुषला मेहनत करायला आणि लक्ष केंद्रित ठेवायला सांगितले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने नुकताच  वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. मराठमोळ्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली ही कामगिरी भारतीय संघाने केले. विश्वचषक जिंकल्यानंतर मायदेशात संघाचे उत्साहात स्वागत झाले. सर्वांनी कौतूक केले. आयुष म्हात्रेची कामगिरी या विश्वचषकात खास राहीली नाही. या विजयानंतर आयुषने भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. या भेटीत सचिनने आयुषला एक खास भेट दिली. शिवाय मोलाच सल्ला ही दिला. त्याचा व्हिडीओ आयुषने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. 

विश्वकप जिंकल्यानंतर आयुष म्हात्रेने सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली. सचिनने यावेळी आयुषला त्याच्या शेवटच्या कसोटी क्रिकेटमधली जर्सी भेट दिली. ही माझी खरी खेळतानाची जर्सी आहे. सही देण्यासाठी जी जर्सी असते ती नाही, असे सचिनने आवर्जून सांगितले. तुझे पुढचे लक्ष हे भारतीय क्रिकेट संघ आहे. त्यामुळे मेहनत कर. लक्ष केंद्रीत करत. कधी ही फोकस जावू देवू नकोस. भारतीय क्रिकेट संघात खेळणं हे तुझ लक्ष असलं पाहीजे असा मोलाचा सल्ला यावेळी सचिन यांनी आयुष म्हात्रेला दिला.

नक्की वाचा - BCCI News : रोहित-विराटला BCCI चा दणका; शुभमन गिलचा दबदबा

आयुषने ही आपण मेहनत करत असल्याचं सचिन यांना सांगितलं. शिवाय आयुषने यावेळी सचिन यांच्या पाया ही पडले. "मी तुम्हाला स्क्रीनवर बघत मोठा झालो आणि आज तुमच्या घरात उभा आहे," अशा शब्दांत आयुषने आपल्या भावना व्यक्त केल्या. जी जर्सी आयुषला दिली गेली त्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. शिवाय धन्यवाद ही दिले. सचिन यांनी दिलेला सल्ला आपल्यासाठी मोलाचा असल्याचं ही त्यांनी सांगितलं. यापुढच्या काळात आपण आणखी मेहनत घेणार असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.  

नक्की वाचा - स्मृती मंधानाच्या आईनं पलाश मुच्छलला Instagram वर डिवचलं, काही वेळात पोस्ट डिलिट केली, पण स्क्रिनशॉट व्हायरल

या भेटीदरम्यान सचिनने आयुषला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि क्रिकेटमधील काही बारकावेही समजावून सांगितले. विश्वचषक जिंकल्यानंतर आयुषचे हे यश भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. सचिनने आयुषच्या मेहनतीचे कौतुक केले असून त्याला भविष्यात भारतीय सीनियर संघात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना आयुषने भारताला वर्ल्डकप जिंकून दिला आहे.   
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com