भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 1 ऑक्टोबर 2025 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीसाठी खेळाडूंच्या वार्षिक मानधनाच्या कराराची यादी जाहीर केली आहे. या वर्षाच्या करारात बीसीसीआयने 'A+' ही सर्वोच्च श्रेणीच रद्द केली आहे. याचा थेट परिणाम रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या ग्रेडवर झाला असून, हे दोन्ही दिग्गज आता 'B' श्रेणीत आले आहेत. नव्या करारात 30 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे.
शुभमन गिलचा दबदबा
ग्रेड A
यात शुभमन गिल, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या तिघांना स्थान मिळाले आहे. शुभमन गिल आता कसोटी आणि वनडेचा कर्णधार असल्याने त्याला टॉप ग्रेडमध्ये बढती मिळाली आहे.
ग्रेड B
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतल्यामुळे ते आता केवळ वनडे फॉरमॅट खेळतात. परिणामी, त्यांना ग्रेड 'B' मध्ये ठेवण्यात आले आहे. रोहित, विराटसह हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे.
ग्रेड C
टी-20 चा नंबर 1 फलंदाज अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना 16 खेळाडूंच्या 'C' ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे. अक्षर पटेल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, शिवम दुबे, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, ध्रुव जुरेल, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, नीतीश कुमार रेड्डी, अभिषेक शर्मा, साई सुदर्शन, रवि बिश्नोई आणि ऋतुराज गायकवाड हे देखील ग्रेड सी मध्ये आहेत.
विश्वविजेत्या महिला खेळाडूंचा सन्मान
ग्रेड A - हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स (सेमीफायनलमधील शतकवीर) आणि दीप्ती शर्मा (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट).
ग्रेड B - रेणुका ठाकूर, शेफाली वर्मा, ऋचा घोष आणि स्नेह राणा.
ग्रेड C- राधा यादव, यस्तिका भाटिया, हरलीन देओल यांच्यासह 13 खेळाडूंचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world