जाहिरात

Cricket News: स्मृती-शेफालीनं बनवलं वर्ल्ड रिकॉर्ड! असा कारनामा करणारी T20 क्रिकेटच्या इतिहासातली पहिली जोडी

हा टप्पा आजपर्यंत जगातील कोणत्याही पुरुष किंवा महिला जोडीला गाठता आलेला नाही हे विशेष मानावे लागेल.

Cricket News: स्मृती-शेफालीनं बनवलं  वर्ल्ड रिकॉर्ड! असा कारनामा करणारी T20 क्रिकेटच्या इतिहासातली पहिली जोडी
  • स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी आंतरराष्ट्रीय महिला T20 क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड केलं आहे
  • या जोडीने एकूण 3500 पेक्षा जास्त धावांची भागीदारी करून नविन विक्रम प्रस्थापित केला आहे
  • स्मृती मंधानाने महिला T20I मध्ये 603 चौकार मारून जागतिक स्तरावर सर्वाधिक चौकार करणारी फलंदाज ठरली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Smriti Manchanda and Shafali Verma record: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक सलामीची जोडी म्हणजे स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा. त्यांनी आपल्या बॅटींगने जागतिक क्रिकेट मध्ये आपली दहशत निर्माण केली आहे. आता याच जोडीने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात या जोडीने पहिल्या विकेटसाठी 115 धावांची तुफानी भागीदारी केली. या सामन्यात स्मृतीने 47 चेंडूंत 74 धावा कुटल्या आहेत. तर 'लेडी सहवाग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफालीने 38 चेंडूंत 55 धावांची जबरदस्त खेळी केली.

स्मृती आणि शेफालीने आज केलेल्या भागिदारीनंतर पुरुष आणि महिला अशा दोन्ही क्रिकेटच्या इतिहासात एक अभूतपूर्व विक्रम आपल्या नावावर कोरला आहे. आंतरराष्ट्रीय T20I मध्ये 3500 पेक्षा जास्त धावांची भागीदारी (Partnership Runs) पूर्ण करणारी ही जगातील पहिलीच जोडी आहे. असं करणारी ही पहिली जोडी असल्यानं त्यांच्या नावावर आता हा नवा विक्रीम नोंदवला गेला आहे.  या दोन्ही स्टार खेळाडूंनी मिळून आतापर्यंत महिला T20I मध्ये एकूण 3519  धावांची पार्टनशीप केली आहे. हा टप्पा आजपर्यंत जगातील कोणत्याही पुरुष किंवा महिला जोडीला गाठता आलेला नाही हे विषेश मानावे लागेल. 

नक्की वाचा - Vaibhav Sooryavanshi: भारतीय क्रिकेटमध्ये नव्या वादाची ठिणगी! वैभव सूर्यवंशीच्या यशावर काही खेळाडूंचा जळफळाट?

या सामन्यात केवळ हा एकमेव रेकॉर्ड झाला नाही. तर आणखी एक विक्रीम या सामन्यात झाला आहे. हा विक्रम  स्मृती मंधानाने आपल्या नावावर केला आहे. तिने एक वैयक्तिक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. महिला आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त बाऊंड्री मारणारी ती जगातील पहिलीच फलंदाज ठरली आहे. स्मृतीच्या नावावर आता 162 सामन्यांत 603 बाऊंड्रीची नोंद झाली आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला (521 चौकार) मागे सोडले आहे. विशेष म्हणजे पुरुष क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या बाबर आझमच्या (477 चौकार) तुलनेत स्मृती खूप पुढे आहे.

T20I सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज 

  • 603* - स्मृति मंधाना (162)  
  • 521 - सूज़ी बेट्स (176)
  • 493 - चमारी अथापथु (156)  
  • 477 - बाबर आज़म (136)  
  • 459 - बेथ मूनी (114)  
  • 449 - पॉल स्टर्लिंग (160)  
  • 435 - डैनी वायट-हॉज (161)  
  • 435 - गैबी लुईस (114)  
  • 432 - हेले मैथ्यूज (122)  
  • 409 - एलिसा हीली (143)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com