- स्मृती मानधन यांनी कसोटी क्रिकेट सामन्यात अचानक आलेल्या मासिक पाळीचा अनुभव सांगितला
- पांढऱ्या जर्सीमध्ये खेळताना मासिक पाळीमुळे डाग लागण्याची भीती होती असं तिने सांगितलं
- कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंना ८ मिनिटांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहिल्यास तितकाच वेळ खेळता येत नाही
स्मृती मानधना भारतीय महिला क्रिकेटचा कणा बनली आहे. ती सध्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार ही आहे. भारतीय महिलांचा क्रिकेट संघ सध्या टी 20 वर्ल्डकपसाठी इंग्लंडमध्ये आहे. त्याच वेळी स्मृती मानधनाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने कसोटी सामन्यादरम्यान आलेला मासिक पाळीचा (Periods) एक अत्यंत कठीण आणि तितकाच धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. क्रिकेट सामन्यादरम्यान तिला अचानक पोटात दुखू लागलं होतं. तिला मासिक पाळी सुरू झाली होती. अशा वेळी पांढऱ्या कपड्यांमध्ये मैदानावर टिकून राहणं किती आव्हानात्मक होतं, हे तिने यावेळी सांगितलं आहे.
कसोटी क्रिकेट सामन्यात खेळाडूंना पांढरा जर्सी-पँट घालावी लागते. सगळेच खेळाडू हा ड्रेस घालतात. ही किस्सा घडला तेव्हा कसोटी क्रिकट सुरू होतं. स्मृती मैदानात होती. स्मृतीने सांगितले की, मैदानात असतानाच तिला अचानक पिरियड्स आले. पांढरा ड्रेस असल्यामुळे डाग पडण्याची तिला भीती होती. त्यामुळे तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. अशा वेळी तिने थेट अम्पायरकडे ब्रेकची मागणी केली. अम्पायरने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तिला नियमाच्या पलिकडे जावून तात्काळ परवानगी दिली. मात्र, या घटनेमुळे महिला क्रिकेटपटूंच्या सुरक्षेसाठी आणि अशा नैसर्गिक परिस्थितीसाठी क्रिकेटचे नियम काय आहेत, यावर आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अशा स्थिती क्किरेटचे नियम काय सांगतात तेही आपण पाहू. क्रिकेटचे नियम MCC (Marylebone Cricket Club) कडून तयार केले जातात. सध्याच्या नियमांनुसार एखादा खेळाडू 8 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मैदानाबाहेर राहिल्यास, तो जितका वेळ बाहेर होता तितका वेळ त्याला गोलंदाजी करता येत नाही. उदाहरणार्थ, खेळाडू 30 मिनिटे बाहेर राहिला तर 30 मिनिटे गोलंदाजी करता येणार नाही. तर फलंदाज स्वतःहून मैदान सोडून गेल्यास त्याला 'रिटायर्ड आउट' मानले जाते. मात्र विरोधी कर्णधाराच्या संमतीनेच तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो असा नियम आहे.
त्याच बरोबर मैदाना बाहेर जाण्यासाठी आणखी काही नियम आहेत. खेळाडूंना दुखापत किंवा आजारपणाच्या कारणास्तव मैदान सोडण्याची परवानगी असते. मात्र मासिक पाळीला 'आजार' मानायचे की नाही, याबाबत आयसीसी (ICC) च्या नियमात अजूनही अस्पष्टता आहे. त्याच स्पष्टता नसल्याने महिला खेळाडूंना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. सध्या क्रिकेटमध्ये 2019 पासून फक्त 'कॉन्कशन सबस्टिट्यूट' (डोक्याला दुखापत झाल्यास बदलणारा खेळाडू) हाच एकमेव नियम पूर्ण बदली खेळाडूसाठी उपलब्ध आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world