जाहिरात

World Record: माणसाचा की विमानाचा आवाज? जगातला सर्वात जोरात ओरडणार माणूस, पाहा Video

जोसेफ यांनी हा 32 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. हा आवाज चेन सॉ किंवा रुग्णवाहिकेच्या सायरनपेक्षाही अधिक तीव्र आहे.

World Record: माणसाचा की विमानाचा आवाज?  जगातला सर्वात जोरात ओरडणार माणूस, पाहा Video
  • ऑस्ट्रेलियातील ५८ वर्षीय जोसेफ मॅकग्रेल-बेटअप यांनी १२२.४ डेसिबल आवाजात काढून जागतिक विक्रम प्रस्थापित केला
  • जोसेफ यांनी १९९४ मध्ये अनलिसा फ्लॅनागन यांनी केलेला १२१.७ डेसिबलचा विक्रम मोडून नवा विक्रम केला आहे
  • त्यांचा ओरडलेला आवाज चेन सॉ किंवा रुग्णवाहिकेच्या सायरनपेक्षा अधिक तीव्र होता

सर्वसामान्य माणूस जास्तीत जास्त किती मोठ्या आवाजात ओरडू शकतो? असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असेल? कदाचित समोरील व्यक्ती ऐकू शकेल इतक्याच जोरात ओरडेल असं उत्तर असू शकतं. मात्र, ऑस्ट्रेलियातील एका व्यक्तीने चक्क टेकऑफ करणाऱ्या जेट विमानाइतक्या जोराने ओरडून नवा वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जोसेफ मॅकग्रेल-बेटअप असे या 58 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या या अद्भूत क्षमतेची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स'मध्ये झाली आहे.

 नक्की वाचा - Ketan Agarwal murder: सियाच्या कर्माची फळं वडीलांना! गोयल कुटुंबाला दुसरा शॉक, घरात भयंकर घडलं

कॅनबेरा येथे राहणाऱ्या जोसेफ यांनी तब्बल 122.4 डेसिबल (dB) इतक्या प्रचंड आवाजात "नाउ" (Now) असा ओरडून हा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी 1994 मध्ये नॉर्दर्न आयर्लंडच्या अनलिसा फ्लॅनागन या शिक्षिकेने 121.7 डेसिबल आवाजात ओरडून विक्रम केला होता. जोसेफ यांनी हा 32 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. हा आवाज चेन सॉ किंवा रुग्णवाहिकेच्या सायरनपेक्षाही अधिक तीव्र आहे.

नक्की वाचा - Lohagad case: केतन अग्रवालच्या हत्ये मागे क्राईम पेट्रोल कनेक्शन! सिया- चेतनला 1 नाही तर 2 गोष्टी नडल्या

विशेष म्हणजे या विक्रमासाठी जोसेफ यांनी कोणताही विशेष सराव केला नव्हता. "हा विक्रम करताना मला तब्बल 7 वेळा प्रयत्न करावे लागले. त्यानंतर काही दिवस माझा आवाज पूर्णपणे बसला होता," अशी प्रतिक्रिया जोसेफ यांनी दिली. जोसेफ यांनी यापूर्वी 2019 मध्ये तिरंदाजीतही एक वेगवान विक्रम केला होता, जो नंतर एका 7 वर्षांच्या मुलाने मोडीत काढला. या विक्रमानंतर जोसेफ यांचे कौतूक होत आहे. शिवाय त्यांनी जो विक्रम केला त्याचा व्हिडीओ ही व्हारयल होताना दिसत आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com