ENG vs IND 1st Test, Day 4 Live Score: दुसऱ्या डावातही रिषभ पंतचे शतक, भारताकडे भक्कम आघाडी

England Vs India Day 4 Leeds Test 2025:भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. भारतीय संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या तर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात 465 धावा केल्या होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
Rishabh Pant Century Ind vs Eng Leeds Test Match: रिषभ पंतने दुसऱ्या डावातही शतक झळकावले
मुंबई:

England Vs India Day 4 Leeds Test 2025: भारत आणि इंग्लंड दरम्यान 5 कसोटी सामन्यांची मालिका (India vs England Test match Series 2025 Update) खेळवण्यात येत असून या मालिकेतील पहिला सामना लीडस इथे सुरू आहे. ( England Vs India Leeds Test 2025)या सामन्याचा आज चौथा दिवस असून भारतीय संघ दुसऱ्या डावातील फलंदाजी करतो आहे. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात फार चांगली झाली नाही मात्र त्यानंतर केएल राहुल आणि रिषभ पंतच्या जोडीने भारताचा डाव सावरला. रिषभ पंत याने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. (Rishabh Pant scores Scentury in second inning)

(नक्की वाचा: भेदक माऱ्याने शिट्टी गुल! बेन डकेट म्हणाला, 'तो' जगातला सर्वोत्तम गोलंदाज..',)

राहुल आणि पंतने डाव सावरला 

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरूवात फार चांगली झाली नाही यशस्वी जयस्वाल (4 रन्स), साई सुदर्शन (30) आणि कर्णधार शुबमन गिल (8 रन्स) जम बसवू शकले नाही. यानंतर केएल राहुलने, रिषभ पंतच्या साथीने भारताला नुसते सावरलेच नाही तर सुस्थितीत आणून ठेवले. पहिल्या डावात झटपट बाद झाल्याने राहुलने अत्यंत सावधपणे खेळ केला. रिषभ पंत 118 धावा काढून बाद झाला. हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत भारतीय संघाकडे असलेली आघाडी 290 धावांपर्यंत पोहोचली आहे. 

Advertisement

(नक्की वाचा:तारीख, वेळ, ठिकाण आणि संघ; पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर)

पोपचे शतक, बुमराहचे पंचक

इंग्लंडचा पहिला डाव 471 धावांवर आटोपला होता. इंग्लंडच्या संघातर्फे ओली पोपने सर्वाधिक धावा केल्या होत्या. पोपने 137 चेंडूंमध्ये 106 धावा केल्या, ज्यात 14 चौकारांचा समावेश होता. हॅरी ब्रूकनेही उत्तम फलंदाजी केली मात्र नशिबाने त्याला साथ दिली नाही. शतकापासून एक धाव दूर असताना तो बाद झाला. 112 चेंडूंचा सामना करत ब्रूकने 11 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 99 धावा केल्या. सलामीवीर बेन डकेट 94 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या ज्यात 9 चौकारांचा समावेश होता. पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडण्यात जसप्रीत बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सर्वाधिक म्हणजे पाच विकेट्स घेतल्या, प्रसिद्ध कृष्णाला तीन, तर मोहम्मद सिराजला दोन बळी टीपत त्याला उत्तम साथ दिली.  

Advertisement

Topics mentioned in this article