
India vs England 2025 Test Series: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन महत्त्वाच्या खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय कसोटी संघ नवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वात नवी सुरुवात करणार आहे. शुक्रवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होते आहे. हेडिंग्ले, लीड्सच्या मैदानावर (India vs England Test Series 2025, Venue) शुबमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडचा सामना करणार आहे. विराट आणि रोहित यांच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाची (England vs India 2025 Test Series) ही पहिलीच कसोटी मालिका असणार आहे, त्यामुळे इंग्लंडचं हवामान, टॉस, प्लेईंग 11 बद्दल भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता आहे.
नक्की वाचा : 'कर्म कधीच माफ करत नाही' टीम इंडियातून वगळलेल्या खेळाडूचा हेड कोच गंभीरवर निशाणा?
गिल चौथ्या क्रमांकावर खेळणार
सामन्याच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत (England vs India 2025 Test Series Press Conference) भारतीय संघाचा उप-कर्णधार ऋषभ पंतने भारताच्या प्लेईंग 11 बद्दल काही संकेत दिले. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर रिकाम्या झालेल्या चौथ्या जागेवर कर्णधार शुबमन गिल फलंदाजी करणार असल्याचं पंतने सांगितलं. उप-कर्णधार ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. ऋषभ पंतने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे प्लेईंग 11 मध्ये कोणाला स्थान मिळणार आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार याबद्दल अजुनच कुतूहल निर्माण झालं आहे.
नक्की वाचा : शुबमन गिल कॅप्टन कसा झाला? जसप्रीत बुमराहनं सांगितली Inside Story
फिरकीपटूंना मिळू शकते संधी
लीड्समधलं वातावरण हे उष्ण राहणार आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांना प्लेईंग 11 मध्ये संधी देण्याचा विचार करु शकतं. याव्यतिरीक्त जलद गोलंदाजीत जसप्रीत बुमराह हाच भारताचं नेतृत्व करेल. यानंतर त्याच्या जोडीला सध्याच्या परिस्थितीत मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळू शकते.
कोणाचे पारडे जड?
- खेळलेले कसोटी सामने - 136
- भारताने जिंकलेले सामने - 35
- इंग्लंडने जिंकलेले सामने - 51
- अनिर्णित - 50
पहिला कसोटी सामना किती वाजता सुरू होणार (India vs England Test Series 2025: Date And Time)
भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी (England vs India 2025 Test Series) सामना 20 जूनपासून हेडिंग्लेच्या लीड्स येथील मैदानावर खेळवला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होईल. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा कर्णधार शुबमन गिल दुपारी 3 वाजता नाणेफेकीसाठी मैदानात येतील.
हा सामना कुठे पाहता येईल? (India vs England Test Series 2025: Live Streaming)
तुम्हाला (Ind vs Eng Test Match) हा सामना टीव्हीवर पाहायचा असल्यास Sony Sports Network वर पाहाता येईल. OTT प्लॅटफॉर्मवर पाहायचे असल्यास हा सामना Jio Hotstar वर पाहाता येईल.
कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेला भारताचा संघ - (India vs England Test Series 2025 India and England Squad)
शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उप-कर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इस्वरन, करुण नायर, नितीश रेड्डी, रविंद्र जाडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा
कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेला इंग्लंडचा संघ
हॅरी ब्रुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रुट, जेमी स्मिथ, बेन स्टोक्स, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन, ख्रिस वोक्स, सॅम कुक, शोएब बशीर, जोश टंग
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world