जाहिरात

Akash Deep: जे बुमराहला जमले नाही ते आकाशने करून दाखवले, 11 वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

लीड्स कसोटीत पहिल्या डावात बुमराहनेही 'पंजा' मारला होता. म्हणजे पाच विकेट घेतल्या होत्या. पण दुसऱ्या कसोटीतील आकाश दीपचा पंजा हा थोडा विशेष आहे.

Akash Deep: जे बुमराहला जमले नाही ते आकाशने करून दाखवले, 11 वर्षांनंतर अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Akash Deep: जो कारनामा बुमराह आपल्या कारकिर्दीत करू शकला नाही, तो आकाश दीपने बर्मिंगहॅम येथे दुसऱ्या कसोटीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पाचव्या दिवशी करून दाखवला. बुमराह नसताना काय होईल, अशी करोडो चाहत्यांना चिंता होती. पण जे घडले, त्याने भारतासोबतच आपल्या कारकिर्दीतील केवळ आठवी कसोटी खेळणाऱ्या आकाश दीपनेही इतिहास रचला. (Akash Deep creates history). खरे तर, लीड्स कसोटीत पहिल्या डावात बुमराहनेही 'पंजा' मारला होता. म्हणजे पाच विकेट घेतल्या होत्या. पण दुसऱ्या कसोटीतील आकाश दीपचा पंजा हा थोडा विशेष आहे. कारण त्याने इंग्लंडच्या टॉप फाईव्ह फलंदाजांचे बळी घेतले.  11 वर्षांनंतर इंग्लंडच्या भूमीवर कोणत्याही भारतीय गोलंदाजाकडून हा कारनामा करणार आकाश हा पहिला खेळाडू ठरला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुमराहने लीड्स कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या होत्या. पण आकाश दीपने दुसऱ्या डावात इंग्लंडच्या टॉप ऑर्डरमधील पाच फलंदाजांना बाद केले. आकाशने सलामीवीर बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक आणि पहिल्या डावातील शतकवीर जॅमी स्मिथ यांच्या विकेट्स घेतल्या. यापूर्वी, 2014 मध्ये लॉर्ड्सवर इशांत शर्माने इंग्लंडच्या टॉप फाईव्ह फलंदाजांना बाद केले होते. आणि याच कामगिरीने आकाश दीपची कामगिरी बुमराहपेक्षा वेगळी ठरली. भारताने  मिळवलेल्या ऐतिहासिक विजयात दुसऱ्या डावात आकाश दीपचे योगदान किती महत्त्वाचे होते हे सांगण्यासाठी हे पुरेसे आहे.

ट्रेंडिंग बातमी - Ind vs End Test: इंग्लंडला घरच्या मैदानावर लोळवले, भारताचा ऐतिहासिक विजय

कर्णधार शुभमन गिलने बर्मिंगहॅममध्ये असे काही केले जे यापूर्वी इतिहासात घडले नव्हते. म्हणजे एकाच सामन्यात अडीचशे किंवा त्याहून अधिक धावा आणि दुसऱ्या डावात दीडशे किंवा त्याहून अधिक धावा त्याने केल्या. पण हे सत्यही तितकेच महत्त्वाचे आहे की, फलंदाज कितीही धावा काढोत, पण विजयावर शिक्कामोर्तब करण्याचे काम गोलंदाजच करतात. आणि याच दृष्टीने संपूर्ण सामन्यात आकाश दीपची कामगिरी 'प्लेयर ऑफ द मॅच' पेक्षा कमी नाही. पहिल्या डावात चार विकेट्ससह आकाश दीपने सामन्यात एकूण दहा विकेट्स घेतल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com