जाहिरात

IND vs WI: 'संजू, तू तिथेच थांब!' डगआऊटमधून कुणाचा निरोप? हाच होता मॅचचा टर्निंग पॉईंट

संजूने अवघ्या 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याला डगआऊटमधून महत्वाचा मेसेज आला.

IND vs WI: 'संजू, तू तिथेच थांब!' डगआऊटमधून कुणाचा निरोप? हाच होता मॅचचा टर्निंग पॉईंट
सौ. बीसीसीआय
  • टी-२० विश्वचषकात भारताने वेस्ट इंडिजवर ५ गडी राखून विजय मिळवला असून संजू सॅमसनने ९७ नाबाद धावा केल्या
  • संजू सॅमसनने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले
  • डगआऊटमध्ये बसलेल्या गौतम गंभीरने संजूकडे पाहून त्याला संयम ठेवण्याचा आणि मैदानात उभा राहण्याचा संदेश दिला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे संजू सॅमसन. त्याने 97 धावांची नाबाद वादळी खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे  भारताला कठीण परिस्थितीतून त्याने बाहेर काढले. या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे डगआऊटमध्ये घडलेली एक घटना. त्यामुळे संपूर्ण सामना फिरला. शिवाय संजू ही मैदानावर खंबिर पणे उभा राहीला. त्याच डगआऊटमधल्या घटनेची चर्चा सध्या क्रिकेट वर्तूळाच रंगली आहे. तिथे असं काय घडलं की संजू पेटून उठला अन् भारताला विजय मिळवून दिला. 

वेस्ट इंडिजने 195 धावांचे मोठे लक्ष भारताला दिले होते. या लक्षाचा  पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि त्यानंतर आलेला ईशान किशन हे दोघेही अवघ्या 10 धावांवर बाद झाले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या संजू सॅमसनने मात्र एका बाजूने किल्ला लढवला. संजूने अवघ्या 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान डगआऊटमध्ये बसलेल्या गौतम गंभीरने संजूकडे पाहत होता. तो त्याला सांगत होता "तू मैदानात उभा राहा, मला तुझी गरज आहे," असे हातवारे केले. 

नक्की वाचा - T20 WC Semifinal: टी ट्वेंटी वर्ल्डकपचे सेमीफायनलचे संघ ठरले! टीम इंडिया कुणाशी भिडणार? 'इथे' रंगणार थरार

मला तुझी गरज आहे हा प्रशिक्षकाने दाखवलेला विश्वास संजूसाठी बूस्टर डोस ठरला. त्याने मग मागे पुढे पाहीले नाही. शेवटपर्यंत खिंड लढवली. एकीकडे सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या बाद होत असताना संजूने संयम सुटू दिला नाही. शेवटच्या षटकात भारताला 6 चेंडूत 7 धावांची गरज होती. संजूने पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 50 चेंडूत 97 धावा केल्या. ज्यात 12 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. 

नक्की वाचा - सचिन तेंडुलकरसोबत डेब्यू, 28 वयात क्रिकेट सोडलं, दारुमुळे ए्क्टिंग करिअरचाही The End, आता 'तो' खेळाडू चर्चेत

या विजयामुळे भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून 4 मार्च रोजी इंग्लंडविरुद्ध भारताचा सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताने बाजी मारली तर भारत पुन्हा एकदा टी - 20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये असेल. मात्र वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यानंतर संजू बाबतची चर्चा रंगली आहे. शिवाय गौतम गंभीरने त्याच्यावर दाखवलेल्या विश्वासाचं ही कौतूक होताना पाहायला मिळत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com