- भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह याच्या वडिलांना यकृताचा कर्करोग आहे
- रिंकूने जिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी तातडीने वडिलांना भेटण्यासाठी नोएडाला परतला
- रिंकूचे वडील खानचंद मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर असून किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले आहे
T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 फेरीत झिम्बाब्वेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज रिंकू सिंह याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिंकूच्या वडिलांना यकृत कर्करोगाचा (Liver Cancer) चौथ्या टप्प्यातील आजार आहे. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या आणीबाणीच्या प्रसंगामुळे रिंकू तातडीने टिम इंडियाला सोडून नोएडात परतला होता. वडिलांसोबत काही तास घालवून तो पुन्हा एकदा भारतीय संघात सामील होण्यासाठी चेन्नईला रवाना झाला आहे. त्याच्या वडिलांची तब्बेत अजूनही नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.
ग्रेटर नोएडा येथील यथार्थ हॉस्पिटलने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, रिंकूचे वडील खानचंद हे सध्या मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची किडनी निकामी झाल्यामुळे त्यांना डायलिसिसवर (Renal Replacement Therapy) ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, पुढील 24 ते 48 तास त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रिंकू सिंह झिम्बाब्वेविरुद्धचा सामना खेळणार आहे. दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापन अभिषेक शर्माच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - Rinku Singh News: टीम इंडियाला मोठा धक्का! रिंकू वर्ल्ड कप सोडून अचानक घरी परतला
तसेच वॉशिंग्टन सुंदरऐवजी अक्षर पटेलचा संघात समावेश होऊ शकतो. घरगुती संकटात असतानाही रिंकूने दाखवलेल्या या व्यावसायिक वृत्तीचे क्रीडा विश्वात कौतुक होत आहे. भारतीय व्यवस्थापनाने रिंकूला प्लेइंग-11 मध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. अभिषेक शर्माच्या ऐवजी संजू सॅमसन संघात परतण्याची शक्यता असून डावखुरा फलंदाज इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. गोलंदाजीमध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या जागी अक्षर पटेलला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे. रिंकूच्या वडिलांच्या प्रकृतीसाठी देशभरातील क्रिकेट चाहते प्रार्थना करत आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह सध्या एका कठीण प्रसंगातून जात आहे. एकीकडे झिम्बाब्वेविरुद्धचा 'करो या मरो'चा सामना आहे, तर दुसरीकडे त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. रिंकूचे वडील खानचंद यांना कॅन्सर असून त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये (CCU) दाखल करण्यात आले आहे. वडिलांच्या भेटीसाठी नोएडात गेलेला रिंकू अवघ्या 6 तासांत परतला असून तो चेन्नईमध्ये टीम इंडियाला जॉईन होणार आहे.