
India vs West Indies 1st Test Series: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आला. टीम इंडियाने हा सामना एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही चांगली कामगिरी केली. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांनी शतके झळकावली. मोहम्मद सिराज आणि जडेजा यांनी गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. या विजयासोबतच भारतीय संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे.
Double Strike! 👊
— BCCI (@BCCI) October 4, 2025
Mohd. Siraj picks up 2️⃣ wickets in the same over!#TeamIndia inching closer to victory 👍
Updates ▶ https://t.co/MNXdZceTab#INDvWI | @IDFCFIRSTBank | @mdsirajofficial pic.twitter.com/t2GnmzgRop
इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधल्यानंतर, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या संघाचा पूर्णपणे पराभव झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध फलंदाजी किंवा गोलंदाजी दोन्हीही चांगली कामगिरी करू शकले नाहीत.
टीम इंडियाच्या तीन खेळाडूंनी शतके झळकावली, तर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना एकही अर्धशतक करता आले नाही. भारतीय गोलंदाजांसमोर ते टिकू शकले नाहीत आणि या कसोटी सामन्यात त्यांना एक डाव आणि १४० धावांनी पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाविरुद्ध दोन्ही डावात वेस्ट इंडिजची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. पहिल्या डावात पाहुण्या संघाला फक्त १६२ धावांच करु शकला.
प्रत्युत्तरात टीम इंडियाने ५ बाद ४४८ धावांवर आपला डाव घोषित केला. २८६ धावांनी पिछाडीवर असलेल्या वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावात चांगली कामगिरी अपेक्षित होती, परंतु संपूर्ण संघ पत्त्यांसारखा कोसळला. दुसऱ्या डावात, तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात वेस्ट इंडिजचा संघ फक्त १४६ धावांवर बाद झाला. यामुळे भारताने पहिल्या कसोटीत एक डाव आणि १४० धावांनी पराभव करून मालिकेत आघाडी घेतली.
ICC Women's World Cup 2025: असं कोण आऊट होतं? पाकिस्तानच्या नाशरा संधूच्या विकेटची जगभर चर्चा
वेस्ट इंडिजकडून अॅलिक अथानाझेने सर्वाधिक ३८ धावा केल्या. जस्टिन ग्रेव्हजने २५ धावा केल्या. जेडेन सेल्सने २२ धावा केल्या. याशिवाय, इतर कोणताही फलंदाज जास्त काळ क्रीजवर टिकू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही. पाहुण्या संघाचा कोणताही फलंदाज दोन्ही डावात अर्धशतक झळकावू शकला नाही. दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधिक चार बळी घेतले. मोहम्मद सिराजने तीन आणि कुलदीप यादवने दोन बळी घेतले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world