जाहिरात

ICC Women's World Cup 2025: असं कोण आऊट होतं? पाकिस्तानच्या नाशरा संधूच्या विकेटची जगभर चर्चा

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात नाशरा संधू फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर फ्लॉप ठरली. नाशरा केवळ 1 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

ICC Women's World Cup 2025: असं कोण आऊट होतं? पाकिस्तानच्या नाशरा संधूच्या विकेटची जगभर चर्चा

Nashra Sandhu, Pakistan Women vs Bangladesh Women:  आयसीसी महिला विश्वचषक 2025 स्पर्धेतील तिसरा सामना 2 ऑक्टोबर रोजी कोलंबो येथे पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघांदरम्यान खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशी महिला संघाने 113 चेंडू आणि सात विकेट्स राखून सहज विजय मिळवला. मात्र, या सामन्यादरम्यान पाकिस्तानी महिला संघाची खालच्या फळीतील फलंदाज नाशरा संधू ज्या पद्धतीने बाद झाली, ते पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले.

नाशरा संधू ज्या प्रकारे बाद झाली, त्याला विचित्र 'हिट-विकेट' म्हणता येईल. पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान 35 व्या षटकात ही विकेट पाहायला मिळाली. बांगलादेशकडून शोर्ना अख्तर गोलंदाजी करत होती. षटकातील दुसऱ्या चेंडूवर नाशराने शॉट ने खेळता चेंडू सोडून दिला. चेंडू शेवटच्या क्षणापर्यंत पाहत असताना, नाशराची बॅट स्टंपला जाऊन आदळली. त्यामुळे तिला निराश होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात नाशरा संधू फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर फ्लॉप ठरली. नाशरा केवळ 1 रन करून पॅव्हेलियनमध्ये परतली. गोलंदाजी करताना तिने एकूण 3.1 ओव्हर्स टाकल्या आणि 8.52 च्या इकोनॉमी रेटने 27 रन खर्च केले. विशेष म्हणजे, तिला एकही विकेट मिळवता आला नाही.

बांगलादेशचा मोठा विजय

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानी महिला संघाने 38.3 ओव्हर्समध्ये 129 रन काढले. बांगलादेशी महिला संघाने हे छोटे लक्ष्य 31.1 ओव्हर्समध्ये केवळ तीन विकेट्सच्या जोरावर सहज गाठले. बांगलादेशच्या डावाची सुरुवात करणाऱ्या रुबिया हैदरने 77 चेंडूंमध्ये नाबाद 54 धावांची सर्वाधिक अर्धशतकीय खेळी केली. तिच्याशिवाय सोभना मोस्टरीने 19 चेंडूंमध्ये नाबाद 24 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि संघाला विजय मिळवून दिला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com