IND VS ZIM: चेपॉकमध्ये 'दवा'चा धोका! भारत-झिम्बाब्वे सामन्यासाठी अमेरिकेहून मागवलं विशेष 'केमिकल

गुरुवारी दुपारीही त्याची पुन्हा फवारणी केली जाणार आहे. हे केमिकल गवतावर एक थर तयार करते, ज्यामुळे दव साचण्याचे प्रमाण कमी होते आणि आऊटफील्ड कोरडे राहण्यास मदत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

India vs Zimbabwe T20 World Cup 2026: टी-20 विश्वचषकातील आपले अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीय संघ आज चेन्नईच्या मैदानावर झिम्बाब्वेचा सामना करणार आहे. मात्र, या सामन्यात दोन्ही संघांसमोर 80 ते 90 टक्के आर्द्रतेचे मोठे आव्हान आहे. रात्रीच्या वेळी पडणाऱ्या दवामुळे चेंडू ओला होऊन गोलंदाजांच्या हाताखालून निसटण्याची भीती आहे. यावर उपाय म्हणून चेपॉक स्टेडियम प्रशासनाने अमेरिकेहून'Dew Cure' नावाचे खास केमिकल मागवले असून त्याची मैदानावर फवारणी करण्यात आली आहे.

'Dew Cure' तंत्रज्ञान काय आहे?

चेन्नईमध्ये रात्रीच्या वेळी पडणारे दव खेळाचा निकाल बदलू शकते. हे टाळण्यासाठी 'इंडियन एक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, मंगळवार आणि बुधवारी मैदानावर हे केमिकल फवारण्यात आले असून, गुरुवारी दुपारीही त्याची पुन्हा फवारणी केली जाणार आहे. हे केमिकल गवतावर एक थर तयार करते, ज्यामुळे दव साचण्याचे प्रमाण कमी होते आणि आऊटफील्ड कोरडे राहण्यास मदत होते.

IND Vs ZIM: भारतासाठी 'करो या मरो'! झिम्बाब्वेविरुद्धचा सामना पाहाण्याआधी NRR चं गणित समजून घ्या

खेळपट्टी आणि हवामानाचे समीकरण: 

चेपॉकचे मैदान पारंपरिकपणे फिरकीपटूंसाठी नंदनवन मानले जाते. मात्र, हवामानाचा अंदाज पाहता खेळात मोठे बदल होऊ शकतात. दवामुळे चेंडू ओला झाल्यास फिरकीपटूंना चेंडूवर पकड (Grip) मिळवणे कठीण होते. तर ओल्या गवतामुळे चेंडू बॅटवर वेगाने येतो ज्यामुळे फलंदाजी करणे सोपे होते. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी (लक्ष्याचा पाठलाग) करण्याचा निर्णय घेण्याची दाट शक्यता आहे.

भारत-झिम्बाब्वे संघांची स्थिती

भारत आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ आपला मागील सामना गमावून येथे आले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभूत झाल्याने भारताचा रन-रेट खालावला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध 107 धावांच्या मोठ्या पराभवानंतर झिम्बाब्वेचा संघही दबावात आहे.

Advertisement

Rinku Singh News: टीम इंडियाला मोठा धक्का! रिंकू वर्ल्ड कप सोडून अचानक घरी परतला