'कोणत्या खेळाडूंना जास्त संधी..', NDTV वर्ल्ड समिट 2025 मध्ये अजित आगरकरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

 Ajit Agarkar at NDTV World Summit 2025: ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वनडेचा कॅप्टन म्हणून शुबमन गिलकडे सूत्रे सोपवली. अशातच अजित अगरकरांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ajit Agarkar Latest News
मुंबई:

Ajit Agarkar at NDTV World Summit 2025: ऑस्ट्रेलिया विरोधात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वनडेचा कॅप्टन म्हणून शुबमन गिलकडे सूत्रे सोपवली. रोहित शर्माला वनडेच्या कॅप्टन्सीमधून बाहेर काढल्याने अजित आगरकर यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली होती. रोहित शर्माच्या चाहत्यांनी आगरकर यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं होतं. अशातच एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2025 मध्ये भारताचे मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी मोठं विधान केलं आहे. भारतीय संघाचा सिलेक्टर म्हणून काम करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं, असं अगरकर यांनी म्हटलं आहे. 

'सिलेक्टर म्हणून तुम्हाला असे काही निर्णय घ्यावे लागतात'

कमेंटेटर म्हणून काम करणं माझ्यासाठी सोपं होतं.पण भारतासाठी खेळणं माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट होती. सिलेक्टर म्हणून तुम्हाला माहित असतं की, तुम्हाला काय करायचं आहे. सिलेक्टर म्हणून तुम्हाला असे काही निर्णय घ्यावे लागतात, जे खूप कठीणही असतात. एक सिलेक्टर म्हणून तुम्ही सर्वांना समाधानी करू शकत नाहीत. ही एक मोठी जबाबदारी आहे.विशेषत: जेव्हा तुम्ही खेळाडू असता आणि नंतर तुम्ही सिलेक्टर बनता, तेव्हा तुम्हाला माहित असतं की, खेळाडूंच्या काय भावना असतात. माझ्यासाठी सिलेक्टरचं काम खूप आव्हानात्मक आहे, असं मला वाटतं.

नक्की वाचा >> धावत्या लोकलवर दगड फेकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश..व्हायरल Video मुळे सत्य आलं समोर, प्रवाशांमध्ये संतापाची लाट!

अजित आगरकर पुढे म्हणाले, खेळणं तुम्हाला सर्वात जास्त समाधानी करतं. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मैदानात पाऊल ठेवता, तेव्हा तुम्हाला माहित असतं की तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. एक खेळाडू म्हणून तुमच्यासाठी ही गोष्ट महत्तावाची असते. चेंडू किंवा बॅट तुमच्या हातात असते. एक सिलेक्टर म्हणून, जेव्हा तुम्ही 15 खेळाडूंचा संघ निवडता, तेव्हा तुमच्या हातात आणखी काहीच नसतं.हे एक आव्हानात्मक, व्यस्त आणि उच्च मागणीचं काम असतं. तुम्ही सर्वांना खुश करू शकत नाहीत.

नक्की वाचा >> Video : मुलीनं शेजारी बसलेल्या पोराच्या सपासप 3 थप्पड मारल्या, IND vs WI सामन्यादरम्यान नको तेच सुरु होतं..

Advertisement

टीका केल्यानं फरक पडत नाही

"इतक्या खेळाडूंमधून निवड होणे एक चांगली गोष्ट असते.यामुळे प्रतिस्पर्धेचं आणि तुमच्या कामगिरीचाही स्तर वाढतो. हा खेळ भारतात इतका लोकप्रिय आहे की, तुमच्या निर्णयावर काही लोक टीकाही करतील. मागील काही वर्षांमध्ये चाहत्यांची संख्या अनेक पटीनं वाढली आहे, असंही अगरकर म्हणाले. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, #JusticeForShreyasIyer असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरु होता, यावर अगरकर म्हणाले,या गोष्टींकडे लक्ष देत नाही. ही काय विजयाची स्थिती नाहीय. आम्ही वर्षभरात खूप क्रिकेट पाहतो. फिटनेस एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची जागा पक्की करण्यासाठी फॉर्म महत्त्वाचा असतो. कोणत्या खेळाडूंना जास्त वेळ द्यायला पाहिजे, हे तुम्हाला माहित आहे. काही लोकांना एव्हढी लांब रस्सी मिळू शकत नाही, हा एक निर्णय आहे.