जाहिरात

धावत्या लोकलवर दगड फेकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश..व्हायरल Video मुळे सत्य आलं समोर, प्रवाशांमध्ये संतापाची लाट!

Woman Throws Stone On A Train Video : गेल्या काही महिन्यांमध्ये धावत्या लोकल ट्रेनवर दगड फेकण्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. अज्ञात व्यक्तीने ट्रेनवर दगड फेकल्याने काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं उघडकीस आलं होतं.

धावत्या लोकलवर दगड फेकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश..व्हायरल Video मुळे सत्य आलं समोर, प्रवाशांमध्ये संतापाची लाट!
Woman Throws Stone On A Train
मुंबई:

Woman Throws Stone On A Train Video : गेल्या काही महिन्यांमध्ये धावत्या लोकल ट्रेनवर दगड फेकण्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. अज्ञात व्यक्तीने ट्रेनवर दगड फेकल्याने काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं उघडकीस आलं होतं. 21 सप्टेंबर रोजी मुंबईच्या शिवडी आणि वडाला रेल्वे स्थानकात ट्रेनवर दगड फेकीची घटना घडली होती. या घटनेत 21 वर्षीय तरुणी जखमी झाली होती. अशातच आता एका व्हायरल व्हिडीओनं खळबळ उडाली आहे. साडी नेसलेल्या एका महिला प्रवाशाने धावत्या ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनवर जोरात दगड फेकल्याचं समोर आलंय. समोरून येणाऱ्या ट्रेनवर लोकोपायलटवर हा दगडाचा मारा करण्यात आल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून उघड झालं आहे. ट्रेनवर दगडाचा मारा करणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, ट्रॅकवर धावणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये साडी नेसलेली महिला दरवाज्याजवळ उभी असलेली दिसते. त्या महिलेनं असं काही कृत्य केलं आहे, जे पाहून लोकांमध्ये संताप उडाला आहे. महिला ट्रेनच्या दरवाजाजवळ उभी असते.त्याचदरम्यान समोरून दुसरी ट्रेन वेगाने जात असते. त्यावेळी महिला हातात असलेला दगड दुसऱ्या ट्रेनवर जोरात भिरकावते आणि तो दगड लोकोपायलटच्या विंडोवर जाऊन आदळतो. ही घटना कधी घडली आहे आणि नेमकी कुठे घडली आहे, याबाबत अद्यापही अधिकृत माहिती समोर आली नाहीय. 

नक्की वाचा >>  Jawed Habib : प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबवर 32 गुन्हे दाखल! पोलिसांनी लुकआऊट नोटिसही धाडली, नेमकं प्रकरण काय?

इथे पाहा त्या महिलेचा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओत दिसतंय की, माथेफिरू असलेल्या या महिलेनं समोरून येणाऱ्या ट्रेनच्या इंजिनवर दगड फेकला. महिलेचं हे कृत्य पाहून सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेक यूजर्सने म्हटलंय की, महिलेचं हे कृत्य बेकायदेशीरच नाही, तर अशा कृत्यामुळे एखाद्या प्रवाशाचा जीवही जाऊ शकतो. जर हा दगड एखाद्या प्रवाशाला लागला असता, तर मोठा अपघातही झाला असता. लोकांनी या महिलेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. सोशल मीडियावर कमेंट करत एका यूजरने म्हटलंय की, हे फक्त साधं कृत्य नाही.तर हा एक गुन्हा आहे. एखाद्याचा जीव जावू शकतो.

नक्की वाचा >> रणवीर सिंग की दीपिका पादुकोण? कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? Net worth चा आकडा वाचून डोळे विस्फारतील

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com