Cricket News: शतक ठोकलं, मॅच जिंकवली, तरी ही टीम इंडियात मिळाली नाही जागा, इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना 14 जुलै रोजी एजबेस्टन येथे, दुसरा सामना 16 जुलैला आणि तिसरा सामना 19 जुलैला लॉर्ड्सवर होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ODI Squad: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात टीम इंजिया 3 एकदिवसीय (ODI) सामने खेळणार आहे. या संघात भारताचा स्टार बॉलर  जसप्रीत बुमराहचे पुनरागमन झाले आहे. तो तब्बल 3 वर्षांनंतर वनडे संघात भाग असेल. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नाबाद 110 धावांची मॅचविनिंग खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वाल याला मात्र संघात स्थान मिळून शकले नाही. तर  विराट कोहलीचे संघात पुनरागमन झाले आहे. रोहित शर्माही या संघाचा भाग असणार आहे.  

जयस्वालला विराट मुळे संघात स्थान मिळू शकले नाही. विराट कोहलीचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी त्याचे खेळणे फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप केल्यानंतर कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंडला रवाना होणार आहे. इथं ही तिन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहे. सर्व वरिष्ठ खेळाडू तंदुरुस्त झाल्यात काही खेळाडूंना दुर्दैवाने बाहेर बसावे लागते, असे गिल म्हणाला होता. त्याचे संकेत ही त्याने या आधी दिले होते.  

Advertisement

नक्की वाचा - Revathi Sule Marriage: सुप्रिया सुळेंचे जावई सारंग लखानी कोण आहेत? वडीलांचे 'भाजप'सोबत आहे खास नातं

या मालिकेत शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यर हा उपकर्णधार असेल.  रोहित शर्मा सलामीला खेळणार आहे. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे.  त्याला प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग साथ देतील. हर्षित राणाचे ही संघात पुनरागमन झाले आहे. यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल आणि ईशान किशनला संधी मिळाली आहे. या संघात यशस्वीला स्थान न मिळाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. सातत्याने चांगला खेळ करून ही यशस्वीच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे. 

नक्की वाचा - Viral Video: दुबईत फुटपाथवरून चालणाऱ्यांना काय वागणूक मिळते? दुबईतून आलेल्या तरुणीचा Video सर्व काही सांगतोय

इंग्लंडविरुद्धचा भारतीय वनडे संघ असा असेल. 
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर बरार. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना 14 जुलै रोजी एजबेस्टन येथे, दुसरा सामना 16 जुलैला आणि तिसरा सामना 19 जुलैला लॉर्ड्सवर होणार आहे.