आयपीएल २०२४ च्या ३९ व्या सामन्यात लखनौ सुपरजायन्ट्सने चेन्नई सुपरकिंग्स विरोधात जबरदस्त विजय मिळवला. लखनौने चेन्नईचा ६ विकेट्सने पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात लक्षात राहील असा हा सामना होता. चेन्नईच्या हातातला विजय एकट्या मार्कस स्टॉयनिसने खेचून आणला. त्याने सामन्यात धडाकेबाज शतक साजरं केलं.
नक्की वाचा- सचिन @ 51 : सचिन तेंडुलकरच्या 51 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
स्टॉयनिसने अवघ्या ६३ चेंडूंत १२४ धावांची नाबाद खेळी केली. मात्र शेवटच्या दोन षटकांत सामना चेन्नईच्या दिशेने झुकतोय असं वाटत असताना स्टॉयनिस आणि दीपक हुड्डाने षटकार-चौकारांचा पाऊस पाडत सामना खिशात घातला. मात्र सोपा वाटणारा सामना हातातून गेल्याने चेन्नईच्या खेळाडूंची निराशा चेहऱ्यावर दिसत होती.
नक्की वाचा- आफ्रिदीनं रिझवानची केली ब्रॅडमनशी तुलना! फॅन्सकडून जोरदार शाळा
या सामन्यादरम्यानचा धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सीएसकेचा डाव सुरु असताना धोनीचा ड्रेसिंग रुममधला हा व्हिडीओ आहे. ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे शेवटच्या षटकांमध्ये मैदानात जोरदार फटकेबाजी करत होते. त्यावेळी कॅमेरामन सतत धोनीला मोठ्या स्क्रीनवर दाखवत होता. ज्यामुळे धोनी संतापला. धोनीने हातातील बॉटल फेकण्याची अॅक्शन करत कॅमेरामनला इशारा दिला. सोशल मीडियावर हा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
सामन्यात काय घडलं?
चेन्नई सुपरकिंग्सने प्रथम फलंदाजी करत २१० धावांचं आव्हान लखनौसमोर उभं केलं. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ६० चेंडूत १०८ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने २७ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. शिवम दुबेने आपल्या खेळीत तीन चौकार आणि ७ षटकार लगावले.
नक्की वाचा - 'मुंबई इंडियन्सकडून खेळलात तर डोकं फुटून जाईल', भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा
चेन्नईने दिलेल्या २१० धावांचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात खराब झाली. क्विंटन डीकॉक पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर कर्णधार केएल राहुल देखील अवघ्या १६ धावांवर बाद झाला. त्यानंतर मार्कस स्टॉयनिकसने जबाबदारी खांद्यावर घेत आपल्या शतकाच्या जोरावर लखनौला विजय मिळवून दिला.