जाहिरात
Story ProgressBack

'मुंबई इंडियन्सकडून खेळलात तर डोकं फुटून जाईल', भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा

Mumbai Indians : माजी भारतीय क्रिकेटपटूनं मुंबई इंडियन्सबाबत धक्कादायक दावा केला आहे.

Read Time: 2 min
'मुंबई इंडियन्सकडून खेळलात तर डोकं फुटून जाईल', भारतीय क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा
Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची या स्पर्धेतील कामगिरी साधारण झाली आहे. (फोटो : BCCI/IPL)
मुंबई:

Mumbai Indians : पाच वेळा आयपीएल जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची या सिझनमधील कामगिरी साधारण झालीय. हार्दिक पांड्याच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या या टीमला 8 पैकी 3 सामनेच जिंकता आले आहेत. त्यांची टीम सध्या सातव्या क्रमांकावर असून 'प्ले ऑफ' गाठण्यासाठी पुढचा प्रत्येक सामना मुंबईसाठी महत्त्वाचा आहे.

मुंबई इंडियन्सनं या सिझनपूर्वी रोहित शर्माला दूर करुन हार्दिक पांड्याला कॅप्टन केलंय. मॅनेजमेंटचा निर्णय मुंबईच्या अनेक फॅन्सना आवडलेला नाही. हार्दिक पांड्याला वानखेडेवर चाहत्यांचा रोष सहन करावा लागला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या सिझनमध्ये चर्चेत असलेल्या मुंबई इंडियन्सच्या कल्चरबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं धक्कादायक खुलासा केलाय.

( नक्की वाचा : एका मोठा खेळाडू होणार आऊट! पाहा कशी असेल वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया )

रायुडू त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळलाय. सहा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या फक्त दोन खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आहे. रायुडूनं स्टार स्पोर्ट्सवरील कार्यक्रमात बोलताना या दोन्ही टीममधील फरक सांगितला. 

'सीएसकेचा प्रोसेसवर भर असतो. त्यांचा मूड आणि मूड स्विंग निकालावर अबवंबून नसतो. मुंबई इंडियन्सचं टीम कल्चर वेगळं आहे. मुंबईच्या टीमचं जास्त लक्ष विजय मिळवण्यावर असतं. विजय मिळवणं हीच त्यांची संस्कृती आईहे. विजयामध्ये कोणतीही तडजोड नाही.'

( नक्की वाचा : रोहित शर्माची शतकी इनिंग व्यर्थ, 20 रन्सनी चेन्नई ठरली 'सुपरकिंग' )

रायुडू पुढं म्हणाला,  मुंबई आणि सीएसकेमधील कल्चर वेगळं आहे. अखेरीस दोन्ही टीम भरपूर मेहनत घेतात. माझ्यामते सीएसकेमधील कल्चर जास्त चांगलं आहे. मुंबई इंडियन्सकडून जास्त खेळलात तर तुमचं डोकं फुटून जाईल. मी मुंबईकडून खेळत होतो त्यावेळी माझ्या खेळात मोठी सुधारणा झाली. मुंबई इंडियन्समध्ये असं कल्चर आहे की तुम्ही तिथं चांगली कामगिरी करता. सीएसकेचं कल्चर वेगळं आहे. तिथं तुम्हाला शांतपणे चांगलं बनवलं जातं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination