जाहिरात

Mi vs Pbks : एकटा नडला मुंबईला भिडला! श्रेयस अय्यरचा वन मॅन शो, पंजाब फायनल मध्ये

आयपीएल 2025 च्या फायनल मध्ये कोण जाणार याचा फैसला करणारा हा सामना होता.

Mi vs Pbks : एकटा नडला मुंबईला भिडला! श्रेयस अय्यरचा वन मॅन शो, पंजाब फायनल मध्ये
फोटो सौजन्य- आयपीएल

मुंबईने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना पंजाबची सुरूवात चांगली झाली नाही. प्रभसिमरन सिंग हा सहा धावा काढून बाद झाला. तर प्रियांश आर्य ही लवकर बाद झाला. त्यानंतर मात्र जॉश इंग्लिस आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. पण इंग्लिस ही 38 धाव करून बाद झाला.पण श्रेयस अय्यर ने एका बाजू लावून धरली होती.एकट्या श्रेयस अय्यरने मुंबईच्या नाकी नऊ आणलं. त्याने एकट्याने पंजाबला फाईनलमध्ये नेले. श्रेयस अय्यरने 87 धावा काढल्या. पाच विकेटने पंजाबने मुंबईचा पराभव केला. आता फायनल मध्ये पंजाब विरुद्ध बंगळूरू हा सामना होणार हे आता स्पष्ट झालं आहे. या दोन्ही टीम कधी ही आयपीएल जिंकल्या नाहीत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयपीएल 2025 च्या फायनल मध्ये कोण जाणार याचा फैसला करणारा हा सामना होता. सामन्याच्या आधी पावसाने व्यत्यय आणला. मात्र त्यानंतर सामना सुरू झाला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने टॉस जिंकत मुंबईला फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकात सहा विकेट सह 203 धावा केल्या. मुंबईकडून रोहित शर्मा अपयशी ठरला. पण जॉनी बेरस्टोने 24 चेंडूत 38 धावा ठोकल्या. 

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, क्वालिफायर-2 मध्ये 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष

त्यानंतर तिलक वर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी मुंबई धुरा सांभाळली. तिलकने 29 चेंडूत 44 धावा केल्या. तर सुर्यकुमार यादव याने ही 26 चेंडूत 44 धावा केल्या. दोघांचे ही अर्धशतक हुकले. पण त्यांनी मुंबईला एका मजबूत स्थिती नेऊन ठेवले. हार्दिक पंड्याला फार काही करता आले नाही. तो 15 धावांवर बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या नमन धीर ने जबरदस्त खेळी केली. त्याने 18 चेंडूत 37 धावा ठोकल्या त्यामुळे मुंबईला  दोनशेचा टप्पा पार करता आला. पंजाबकडून ओमरझाई याने दोन विकेट घेतल्या. पंजाबच्या इतर गोलंदाजांना प्रभाव पाडता आला नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com